राधा आणि पिंगा गर्ल्सना वेगळं करण्याचा भुतेंचा प्लॅन यशस्वी होईल का?
कलर्स मराठीवरील पिंगा गं पोरी पिंगा मालिकेमध्ये प्रेक्षकांना एक भावनिक आणि रहस्यमय वळण अनुभवायला मिळणार आहे. राधा अचानक गायब झाल्यामुळे पिंगा गर्ल्सच्या पायाखालची जमीन सरकली आहे. राधाच्या येण्याने घरात नवंचैतन्य आले होते, सगळ्यांची ती लाडकी बनली होती. पण, अचानक तेजाला अनभिज्ञ दोघांनी येऊन सांगितले आम्ही तिचे आई बाबा आहोत आणि तेजाने विश्वास ठेवला.
डॉ. कलाम यांच्या भूमिकेसाठी धनुषचीच निवड का केली? ओम राऊतने सांगितला किस्सा
इतकेच नसून त्यांच्यासोबत राधाला ते घेऊन देखील गेले. पण ज्यांच्यासोबत राधा गेली, ते खरोखरच तिचे आई बाबा आहेत का? हा प्रश्न तेजाला पिंगा गर्ल्स विचारतात आणि खरं सांगतात. आता खोटं सोंग घेऊन आलेली ते कोण होते ? राधाला पिंगा गर्ल्स कश्या शोधून काढणार? पिंगा गर्ल्सना कळेल का की यामागे भुतेंचा हात आहे ? हे सगळे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. तेव्हा पहा एक तासाचा विशेष भाग ‘पिंगा गं पोरी पिंगा’ १ जून दु. 1 वा. आणि संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर.
शुटिंग दरम्यान इमरान हाश्मीची तब्येत बिघडली, अभिनेत्याला काय झालं ?
राधाचे हे अपहरण तर नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यातच या घटनेमागे भुते असल्याचे संकेत त्यांना मिळणार का? राधा कुठे आहे, कोणाकडे आहे, आणि का नेण्यात आली आहे, हे एक मोठं रहस्य पिंगा गर्ल्ससमोर बनलं आहे. या सगळ्या प्रसंगामुळे तेजा आणि पिंगा गर्ल्समध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे. मात्र पिंगा गर्ल्स यांच्यातील नातं केवळ मैत्रीपुरतं मर्यादित नाही, तर ते एकमेकांसाठी झगडण्याचं, संकटात साथ देण्याचं नातं आहे. आणि म्हणूनच आता त्या मिळून राधाचा शोध घेणार आहेत.
सुदेश म्हशिळकरांचं अकाउंट हॅक? सायबर क्राईमने दिली महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर
आता सर्वांचं लक्ष आहे की, पिंगा गर्ल्स ही अडचण कशी पार करणार? राधाला वाचवण्यात त्या यशस्वी होणार का? नात्यांची गुंतागुंतं, जबाबदारीची जाणीव, आणि नाजूक भावनांचे अनेक थर उलगडणार आहेत. तेव्हा जाणून घेण्यासाठी बघत राहा ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेचा एक तासाचा विशेष भाग १ जून दु. 1 वा. आणि संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर.