Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पापाच्या सावलीत अडकलेला माणूस पुन्हा पूर्वीचा ‘देवमाणूस’ होईल का? चित्रपटाचा अफलातून ट्रेलर रिलीज

लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या 'देवमाणूस' या पहिल्या मराठी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 08, 2025 | 07:22 PM
पापाच्या सावलीत अडकलेला माणूस पुन्हा पूर्वीचा ‘देवमाणूस’ होईल का? चित्रपटाचा अफलातून ट्रेलर रिलीज

पापाच्या सावलीत अडकलेला माणूस पुन्हा पूर्वीचा ‘देवमाणूस’ होईल का? चित्रपटाचा अफलातून ट्रेलर रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित मल्टीस्टारर ‘देवमाणूस’ या मराठी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पोस्टर आणि टीझरनंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचा ट्रेलर आला आहे. चित्रपटाच्या टीझर आणि पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. दरम्यान, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ या पहिल्या मराठी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार आहेत.

नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जाहीर; जावेद अख्तर, राजू परुळेकर यांचा होणार विशेष सन्मान…

भव्य ट्रेलर लॉन्चिंग सोहळ्याला दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर, कलाकार महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके, अभिजीत खांडकेकर, लेखिका नेहा शितोळे तसेच निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. हा क्षण लव फिल्म्सच्या मराठी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून ट्रेलरची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. चित्रपटातील कलाकारांनी ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. “एका पापाच्या सावलीत अडकलेला देवमाणूस पुन्हा पूर्वीचा ‘देवमाणूस’ होईल का? अंतर्मनाच्या आणि जगाबरोबरच्या संघर्षाची कहाणी ‘देवमाणूस’ ट्रेलर आला आहे तुमच्या भेटीला… २५ एप्रिल पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!” असं कॅप्शन निर्मात्यांनी दिलं आहे.

 

ट्रेलरमध्ये ‘देवमाणूस’च्या रहस्यपूर्ण, गूढ आणि भावनिक कथानकाची झलक पाहायला मिळते. दमदार अभिनय, दाट भावनांचा प्रवाह आणि उत्कंठा वाढवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट एक संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली असून ‘देवमाणूस’ मराठी प्रेक्षकांमध्ये जागतिक स्तरावर आपली छाप सोडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर म्हणतात, “देवमाणूस माझ्यासाठी अत्यंत जवळचा चित्रपट आहे. भावना, नाट्य आणि थरार यांचा सुरेख संगम या चित्रपटात आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. संपूर्ण टीमच्या अथक मेहनतीमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. प्रेक्षक या कथेशी आणि पात्रांशी कसा संवाद साधतात हे पाहाण्याची उत्सुकता लागली आहे.”

६ वर्षांनंतर विशाल ददलानीने ‘इंडियन आयडल’ शो का सोडला? स्वतःच सांगितलं कारण

निर्माते लव रंजन म्हणाले, “देवमाणूस हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला मनापासून दिलेला आदर आहे. त्यातील कला, संगीत आणि कथा सांगण्याची शैली यांचा सन्मान आहे. मराठी चित्रपटसृष्टीत उंबरठा ओलांडताना, हा केवळ आरंभ नसून दर्जेदार कथा सादर करण्याचा आमचा नवा संकल्प आहे.” निर्माते अंकुर गर्ग म्हणाले, “देवमाणूस हा लव फिल्म्सच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तेजस देऊस्कर यांचे प्रभावी दिग्दर्शन, तसेच महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि संपूर्ण टीमच्या दमदार कामगिरीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांवर खोल प्रभाव टाकणार आहे. आम्ही या चित्रपटाचा भाग होण्याचा अभिमान बाळगतो आणि २५ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहोत. मराठी चित्रपटसृष्टीसाठी अधिक अर्थपूर्ण आणि आकर्षक चित्रपट देण्याचा आमचा निर्धार ‘देवमाणूस’मधून अधोरेखित होतो.” लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’, लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित, हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Devmanus trailer mahesh manjrekar renuka shahane subodh bhave set stage for gripping drama

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 07:22 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला, “रुबाब” डिजिटल प्रीमियरसाठी सज्ज; ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट
1

प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला, “रुबाब” डिजिटल प्रीमियरसाठी सज्ज; ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट

“आता परीक्षा देवाची!” अध्यात्म vs विज्ञान या संघर्षाचा नवा अध्याय; Deool Band 2 लवकरच, चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
2

“आता परीक्षा देवाची!” अध्यात्म vs विज्ञान या संघर्षाचा नवा अध्याय; Deool Band 2 लवकरच, चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

भारत माता चित्रपटगृहात ‘सुपर डुपर’चा भव्य प्रीमियर; 6 वर्षांनंतर थिएटरचा दिमाखदार पुनरागमन सोहळा
3

भारत माता चित्रपटगृहात ‘सुपर डुपर’चा भव्य प्रीमियर; 6 वर्षांनंतर थिएटरचा दिमाखदार पुनरागमन सोहळा

Prajakta Mali : चाहत्याने केला प्रश्न “प्राजक्ता, तू लग्न कधी करणार?” अखेर अभिनेत्रीने उत्तर दिलेच
4

Prajakta Mali : चाहत्याने केला प्रश्न “प्राजक्ता, तू लग्न कधी करणार?” अखेर अभिनेत्रीने उत्तर दिलेच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.