Samashti Award Announced
जावेद अख्तर यांनी आपल्या ७० आणि ८० च्या दशकातील सिनेकरियरमध्ये ‘अंदाज’, ‘यादों की बारात’, ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘हाथी मेरे साथी’ आणि ‘शोले’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहेत. जावेद अख्तर हे एक सुप्रसिद्ध आणि प्रख्यात गीतकार असून माजी खासदार देखील ते आहेत. कायमच आपल्या अभिनयामुळे नाही तर, जावेद अख्तर आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे संगीतकार आता एका पुरस्कारामुळे चर्चेत आले आहेत. त्यांना समष्टी ऊलगुलान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
६ वर्षांनंतर विशाल ददलानीने ‘इंडियन आयडल’ शो का सोडला? स्वतःच सांगितलं कारण
जावेद अख्तर यांच्यासोबतच राजू परुळेकर, संदिप तामगाडगे, डॉ. श्यामल गरूड, डॉ. अमोल देवळेकर, ॲड. दिशा वाडेकर यांनाही समष्टी ऊलगुलान पुरस्कार जाहीर (Samashti Award Announced) करण्यात आला आहे. दरम्यान, समष्टी ऊलगुलान हा पुरस्कार विचार, विद्रोह, शब्द, संवेदना आणि कृती यांचा संगम घडवणाऱ्या व्यक्तींना प्रदान केलेला आहे. काही तासांपूर्वीच समष्टी फाऊंडेशनने यंदाच्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार तर राजू परुळेकर यांना समष्टी ऊलगुलान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांना ‘सत्यशोधक उपाधी’ ही प्रदान करण्यात येणार आहे.
राजकीय षडयंत्र अन् प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं कथानक; Raid 2 चा जबरदस्त ट्रेलर रिलीज…
‘सारं काही समष्टीसाठी’ या सोहळ्याचे यंदा आठवं वर्ष आहे. ११ आणि १२ एप्रिल २०२५ रोजी भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात दुपारी १२ ते रात्री १० या वेळेत हा दोन दिवसीय सोहळा रंगणार आहे. या दोन दिवसांत कला, साहित्य, सिनेमा, सामाजिक आदी विविध विषयांवर चर्चा होणार आहे. या सोहळ्या दरम्यान ७ मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. साहित्य आणि भाषाशास्त्रात ५० वर्षांच्या दिलेल्या योगदानासाठी प्रख्यात गीतकार व विचारवंत जावेद अख्तर यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांना समष्टी ऊलगुलान पुरस्कार, आयपीएस अधिकारी संदिप तामगाडगे यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार, प्रसिद्ध साहित्यिका डॉ. श्यामल गरूड यांना समष्टी गोलपीठा पुरस्कार, डॉ. अमोल देवळेकर यांना समष्टी निर्मिक पुरस्कार, तर ॲड.. दिशा वाडेकर यांना समष्टी मूकनायक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अक्षय शिंपी यांची हृदयस्पर्शी दास्तांगोई सादरीकरण, रसिका आणि कृतिका बोरकर यांचा संगीत कार्यक्रम, वरुण सुखराज, सुमेध, मयुरेश कोण्णूर यांचा आशिष शिंदे यांच्यासोबत संवाद, सुकन्या शांता, दीपा पवार, अलका धुपकर, ॲड. दिशा वाडेकर यांच्यासोबत परिसंवाद, ‘तुही यत्ता कंची’- हेमंत ढोमे, मंदार फणसे, प्रज्ञा पवार, सत्यशोधक जलसाचे विशेष सादरीकरण, मालविका राज, सिद्धेश गौतम, कैलास खानजोडे, प्रशांत कुवर, रोहीणी भडांगे, स्वप्ना पाटसकर विक्रांत भिसे आणि लक्ष्मण चव्हाण आदी कलाकारांचे चित्र आणि शिल्प प्रदर्शन हे यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य असणार आहे. सदर सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. स्वप्नील ढसाळ, वैभव छाया, हरेश तांबे यांनी केले आहे.