अभिनेत्री रुची गुज्जरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अभिनेता आणि दिग्दर्शक मान सिंगवर चप्पल फेकत आहे आणि त्याच्याशी सर्वांसमोर भांडत आहे. ही घटना ‘सो लॉन्ग व्हॅली’च्या प्रदर्शनादरम्यान घडली, जेव्हा तिथे मोठ्या संख्येने लोक आणि संपूर्ण मीडिया उपस्थित होते. अभिनेत्री रागाने ओरडताना आणि पोलिसांना बोलावण्याबद्दल बोलताना दिसत आहे. काय आहे नक्की प्रकरण जाणून घ्या (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
मुंबईतील एका थिएटरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. त्यानंतर तिथे जबरदस्त गोंधळ उडाला. व्हिडिओमध्ये अभिनेत्री रुची गुज्जर ओरडताना आणि आपला रागामुळे स्वतःवरील नियंत्रण गमावताना दिसत आहे. शेवटी, ती तिच्या चप्पल काढताना आणि तिच्या समोर उभ्या असलेल्या मान सिंगला मारताना दिसत आहे. असेही सांगितले जात आहे की तिचा निर्माता करण सिंह चौहानसोबत पैशांवरून वाद सुरू आहे.
हास्य जत्रा फेम निमिष कुलकर्णीच जमलं! लवकरच अडकणार लग्नबंधनात
रूची गुज्जरचा हंगामा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मान सिंग स्क्रीनिंगच्या ठिकाणी पोहोचले होते. अभिनेत्री त्यावेळी निदर्शकांसह दिसली. तिच्या आजूबाजूचे लोक निर्मात्यांविरुद्ध घोषणाबाजी करताना दिसले. त्यांनी निर्मात्यांचा फोटो असलेले फलक हातात धरले होते. आणि त्यावर लाल रंगात क्रॉस मार्क बनवला होता. काही पोस्टर्समध्ये मान सिंग गाढवावर बसलेले दाखवले होते आणि या स्क्रिनिंगमध्येच सर्व गोंधळ घडला तो रूची गुज्जरमुळे.
पैशाच्या प्रकरणावरून वाद
रुची गुज्जरने सांगितले की, गेल्या वर्षी २०२४ मध्ये, करण सिंह चौहानने तिच्याशी संपर्क साधला आणि दावा केला की तो एक हिंदी टीव्ही मालिका बनवत आहे, जी सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करणने तिला त्या प्रकल्पात सह-निर्माता म्हणून सामील होण्यास सांगितले आणि त्यासंबंधी कागदपत्रेही पाठवली.
विश्वासावर, तिने जुलै २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान तिच्या कंपनी एसआर इव्हेंट अँड एंटरटेनमेंटकडून अनेक पेमेंट केले, जे करण चौहानच्या स्टुडिओशी जोडलेल्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. परंतु आजपर्यंत प्रकल्प सुरू झाला नाही आणि तिचे २५ लाख रुपये अडकले आहेत. जेव्हा तिने याबद्दल विचारणा केली तेव्हा ते प्रत्येक वेळी ते पुढे ढकलत राहिले. खोटे बोलत राहिले असा दावा रूचीने केलाय.
FIR दाखल
रुची गुज्जरने सांगितले की, तिला नंतर कळले की तिने पाठवलेले पैसे टीव्ही मालिका बनवण्यासाठी वापरले गेले नाहीत. उलट ते ‘सो लॉन्ग व्हॅली’च्या निर्मितीसाठी खर्च केले गेले. तिने माध्यमांना सांगितले की, ‘जेव्हा मला कळले की हा चित्रपट २७ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे, तेव्हा मी त्यांना माझे पैसे लगेच परत करण्यास सांगितले, ज्यावर त्यांनी मला धमकावण्यास सुरुवात केली.’ आता तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी निर्मात्यांविरुद्ध फसवणुकीचा एफआयआर दाखल केला आहे.
कोण आहे रुची गुज्जर? जिने मोदींच्या फोटोचा हार घालून केली Cannes 2025 च्या रेड कार्पेटवर एन्ट्री
व्हायरल व्हिडिओ