‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या बाबतीतली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील ‘तुर कलेयां’ (Tur Kalleyan Song)हे गाणं अनेक ठिकाणी चित्रित करण्यात आलं आहे. खरंतर विविध डेमोग्राफिक्सला समाविष्ट करण्याची या गाण्याच्या स्क्रिप्टची मागणी होती. त्यानुसार बहुप्रतिक्षित लाल सिंग चड्ढा देशाच्या शक्य तितक्या पुरातन अशा विविध भौगोलिक प्रदेशांना स्पर्श करतो.
[read_also content=”‘इमर्जन्सी’चा टीझर पाहून अनुपम खेर यांनी केलं कंगनाचं कौतुक, म्हणाले…. https://www.navarashtra.com/movies/anupam-kher-praised-kangana-ranaut-after-watching-emergency-teaser-nrsr-304389.html”]
‘लाल सिंग चड्ढा’मधील ‘तुर कलेयां’ हे गाणं चित्रपटातील सर्वात लांब शॉट सीक्वेन्स दाखवतं. हा मोठा सीक्वेन्स शूट करण्यासाठी सुमारे दीड महिना लागला. ‘तुर कलेयां’च्या शूटिंगसाठी टीमने काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास तर केलाच, मात्र ५ सेकंदाचा शॉट चित्रित करण्यासाठी दूरदूरचा प्रवासही केला.
यादरम्यान आमिर खान गुडघेदुखीने त्रस्त झाला होता. यामुळे आमिरला पेन किलरचाच आधार घ्यावा लागलाच शिवाय शूटिंगदरम्यान त्याने आपल्या फिजिओथेरपिस्टलाही सोबत घेतलं होतं. आमिर खानने चित्रपटाचे हे सीन शूट करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. प्रचंड वेदना होत असतानाही आमिर खानने शूट पुढे न ढकलता, वेळेवर शूट पूर्ण केले. आमिरने हा निर्णय घेतला कारण आधीच लॉकडाऊनमुळे या सीक्वेन्सचे चित्रीकरण आधीच लांबले होते आणि त्याला या चित्रीकरणासाठी आणखी वेळ वाया घालवायचा नव्हता.
आमिर खान प्रॉडक्शन, किरण राव आणि वायाकॉम 18 स्टुडिओज निर्मित, ‘लाल सिंग चड्ढा’ मध्ये करीना कपूर खान, मोना सिंग आणि चैतन्य अक्किनेनी देखील आहेत. हा चित्रपट फॉरेस्ट गंपचा अधिकृत रिमेक आहे. लाल सिंग चड्ढा ११ ऑगस्ट २०२२ रोजी रिलीज होणार आहे.