(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड गायक अरिजित सिंगने गेल्या महिन्यात घोषणा केली होती की तो कोणतेही नवीन पार्श्वगायन प्रकल्प हाती घेणार नाही. परंतु, त्याला संगीताची खूप आवड आहे, म्हणून तो ते पूर्णपणे सोडून देणार नाही असेहि त्याने यामध्ये म्हटले. अरिजित सिंगच्या या बातमीने सर्वांनाच अस्वस्थ केले आहे. गायकाच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सुपरस्टार आमिर खानने त्याच्या घरी भेट दिली.
आमिर खान अरिजितला का भेटले?
आमिर खानने अरिजितच्या घरी भेट दिल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. लोकांना असे वाटू लागले की तो गायकाला निवृत्ती मागे घेण्यास उद्युक्त करण्यासाठी तिथे पोहचला आहे. आमिरने मुर्शिदाबाद येथील त्याच्या घरी अरिजितसोबत बराच वेळ घालवला असल्याने, या अटकळांना उधाण आले. आता, या भेटीमागील खरे सत्य समोर आले आहे. आमिर प्रत्यक्षात त्याचा मुलगा जुनैदच्या नवीन चित्रपट “एक दिन” च्या शीर्षकगीतावर चर्चा करण्यासाठी अरिजितकडे गेला होता.
शिखर धवन- सोफी शाइनचा दिमाखदार विवाहसोहळा; Manish Malhotra च्या शाही पोशाखात रॉयल ग्लॅमरची झलक
या बैठकीचा एक व्हिडिओ आज, २३ फेब्रुवारी रोजी युट्यूबवर समोर आला आहे, ज्यामध्ये अरिजीतने गायलेले शीर्षकगीत ऐकू येत आहे. व्हिडिओची सुरुवात आमिरने गायकाला त्याच्या निवृत्तीचे कारण विचारण्यापासून होते. तो त्याला विचारतो की तो आतापासून बॉलीवूड गाणी गाणे थांबवणार आहे का? यावर अरिजीत काहीच उत्तर देत नाही. परंतु, आमिर त्याला सांगतो की जर गायकाने गाणे थांबवले तर त्या सर्वांचे मोठे नुकसान होईल. सर्वजण हसतात. ही सगळी गंमत चाहत्यांना या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाली आहे.
निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अरिजीतचे पहिले गाणे रिलीज
व्हिडिओमध्ये, आमिर खान, त्याची टीम आणि चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शकासह, अरिजीतच्या घरी पोहचते, जिथे ते त्याच्या कुटुंबाला भेटतात. ते त्याच्या घरच्या स्टुडिओमध्ये गाणे रेकॉर्ड करताना दिसत आहेत. यादरम्यान, आमिर घरी बनवलेले जेवण देखील खातो आणि गायकासोबत बुद्धिबळ खेळता देखील दिसला आहे. आमिर आणि अरिजीत मुर्शिदाबादच्या रस्त्यांवर फिरतानाही दिसत आहे. चाहत्यांना अरिजीत सिंगचे हे गाणे त्याच्या इतर गाण्यांप्रमाणेच खूप आवडले आहे.
‘Toxic’ मेकर्सने वापरला ‘Dhurandharचा’ फॉर्मूला? यशच्या चित्रपटात TV अभिनेत्रीची दमदार एन्ट्री
पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अरिजीतचे गाणे ऐकणे चाहत्यांसाठी भावनिक क्षण ठरले. त्यांनी गायकाला पार्श्वगायनाकडे परतण्याची विनंती केली. परंतु, अरिजीत आपला निर्णय बदलेल की नाही हे वेळच सांगेल. आमिर खानच्या निर्मितीतील “एक दिन” या चित्रपटात जुनैद खानसोबत दक्षिणेतील अभिनेत्री साई पल्लवी देखील मुख्य भूमिकेत झळकली आहे. हा चित्रपट १ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.






