गदर २ : अभिनेता सनी देओल (Sunny deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) यांचा गदर २ (Gadar 2) या चित्रपटाला थिएटरमध्ये दमदार दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. पहिल्या आठवड्यामध्ये २८० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यामध्येही बॉक्स ऑफिसवर (Box office) कमालीचे वातावरण केले आहे. गदर २ या चित्रपटाने रिलीजच्या १ दिवसांनंतरही अभिनेता सनी देओल स्टारर ‘गदर २’ या चित्रपटाची चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची पहिली पसंती कायम आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गदर २ ने दुसऱ्या आठवड्यामध्ये दमदार सुरुवात केली आहे. त्याचबरोबर चित्रपटाने ८ दिवसांत ३०० कोटींची कमाई करून मोठा विक्रम केला आहे. इतक्या कमी कालावधीमध्ये सनी देओलच्या चित्रपटाने सर्वाधिक कामे कमाई करणार्या बॉलीवूड चित्रपटांच्या टॉप १० यादीत स्थान मिळवले होते.
आता १४ दिवसानंतर ‘गदर २’चे कलेक्शन (Collection) भारतातील सर्वात मोठ्या हिंदी चित्रपटांना स्पर्धा देत आहेत. गुरुवारच्या जोरदार कमाईसह सनीच्या चित्रपटाने थिएटरमध्ये दोन धडाकेबाज आठवडे पूर्ण केले आणि आता तिसऱ्या आठवड्यात पुन्हा मोठे रेकॉर्ड बनवण्यास सज्ज झाला आहे. २४ ऑगस्ट रोजी या चित्रपटाने एका आठवड्याच्या कमाईनंतर बॉक्स ऑफिसवर बड्या चित्रपटांनी रंग दाखवायला सुरुवात केली आहे. तर गदर २ ने १३ दिवस दुहेरी अंकात कमाई सुरूच ठेवली आहे. १४ व्या दिवशी पहिल्यांदाच सनीचा चित्रपट दुहेरी अंक चुकला. मात्र, दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ‘गदर २’ ने बॉक्स ऑफिसवर ८ कोटींहून अधिकची कमाई केली. या चित्रपटाने १४ दिवसांमध्ये ४१९ कोटी रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. दोन आठवड्यामध्ये हा चित्रपट संपूर्ण कलाकारांसह दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.
गदर २ या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये येते. या प्रकरणामध्ये अभिनेता प्रभासचा बाहुबली २ हा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट होता, ज्याने दुसऱ्या आठवड्यात १४३ कोटींहून अधिक कमाई केली. दुस-या क्रमांकावर आमिर खानचा ‘दंगल’ जवळपास ११६ कोटी रुपयांसह होता. तर तिसऱ्या क्रमांकावर मागील वर्षीचा ‘द कश्मीर फाइल्स’चा आश्चर्यकारक हिट होता, ज्याने दुसऱ्या आठवड्यात सुमारे १०९ कोटी रुपयांची कमाई केली. आता सनीचा ‘गदर २’ या यादीत ‘बाहुबली २’ (Bahubali 2) नंतर १३४ कोटींच्या जवळपास कमाई करून दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या आठवड्याच्या कमाईमध्ये या चित्रपटाने ‘दंगल’ (Dangal) आणि ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे.