‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) चित्रपट खूप गाजला. या चित्रपटावर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. पण या चित्रपटामधील एका सीनचा वापर चक्क रेस्टॉरंटच्या जाहिरातीसाठी करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या कराची येथील रेस्टॉरंटने (Pakistani Restaurant Advertisement) तशी जाहिरात वापरली आहे. या रेस्टॉरंटच्या जाहिरातीचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटामध्ये एका सीनदरम्यान गंगुबाई आपल्या ग्राहकांना बोलावत असते. याच सीनचा वापर कराचीमधील या रेस्टॉरंटने केला आहे. रेस्टॉरंटने आलियाच्या या सीनचा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रेस्टॉरंटने खास पुरुषांसाठी ऑफर ठेवली असल्याचं भलं मोठं पोस्टर दिसत आहे. तसेच त्यांनी यासाठी एक टॅगलाईन देखील तयार केली आहे.
“आजा ना राजा…अजून कशासाठी वाट पाहतो?” अशी ही टॅगलाईन आहे. रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या पुरुष व्यक्तीला २५ टक्के ऑफर देण्यात आली आहे. पाकिस्तानमधील या रेस्टॉरंटची जाहिरात पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली.
[read_also content=”तळोजा येथे भंगार गोदामाला आग; जीवितहानी नाही https://www.navarashtra.com/maharashtra/warehouse-fire-at-taloja-midc-no-casualties-nrvb-293951/”]
सोशल मीडियावर संताप व्यक्त होताना पाहून या रेस्टॉरंटने एक पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे कोणत्याच प्रकारची माफी न मागता आपलंच कौतुक करताना ते दिसत आहे. त्यांनी म्हटलं की, “ही फक्त एक कल्पना आहे. ही पोस्ट एका संकल्पनेवर आधारित आहे. आम्ही पूर्वीसारखंच प्रेमाने तुमची सेवा करण्यास हजर आहोत. मुव्ही करे तो आग रेस्टॉरंट करे तो पाप” सोशल मीडियावर या रेस्टॉरंटविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.