फोटो सौजन्य- Instagram
विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांचा ‘बॅड न्यूज’ काल 19 जुलैला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. ट्रेलरमुळे ही उत्सुकता अजून वाढली. विकीचे तोबा तोबा गाणाने तर सध्या कहर केला आहे. त्याच्या डान्स लोकांना प्रचंड आवडत आहे. यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाचे आगाऊ केले होते. काल चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला बॅड न्यूज मिळाली की गुड न्यूज हे जाणून घेऊया
बॅड न्यूज पहिला दिवस
आनंद तिवारी दिग्दर्शित ‘बॅड न्यूज’ त्याच्या अनोख्या कथेमुळे चर्चेत आहे. त्यामुळे प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाबाबत सर्वत्र चर्चा रंगली होती. आता हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवसाच्या उत्कृष्ट आगाऊ बुकिंगमुळे चित्रपटाची सुरुवात चांगली झाली आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडेही आले आहेत.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, बॅड न्यूजने पहिल्या दिवशी 8.50 कोटींची कमाई केली आहे. या कमाईसह हा चित्रपट विकी कौशलच्या चित्रपट कारकीर्दीतील पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या अगोदर ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ने 8.20 कोटी रुपयांची कमाई केली होती. उरी 2018 चा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता.
स्पर्धा असूनही ‘बॅड न्यूज’ची चांगली सुरुवात
सुपहरहिट ‘कल्की 2898’ गेल्या आठवड्यात आलेला अक्षय कुमारचा ‘सरफिरा’, ‘इंडियन 2’ हे चित्रपटांशी ‘बॅड न्यूज’ ची स्पर्धा होती. या स्पर्धेत बॅड न्यूज यशस्वी होताना दिसत आहे त्यामुळेच चित्रपटाने चांगली ओपनिंग घेतली आहे. चित्रपटाला मिळालेला पहिल्या दिवसाचा प्रतिसाद पाहता पहिल्या आठवड्यात 30-35 कोटींची कमाई करु शकतो. त्यामुळे हा चित्रपट हिट ठरु शकतो.
बॅड न्यूज हा अक्षय कुमार स्टारर गुड न्यूजचा सिक्वेल आहे. गुड न्यूजचे बॉक्स ऑफिस कलेक्शन रुपये 200 कोटी होते आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यामुळे बॅड न्यूज ही गुड न्यूज प्रमाणे हिट कामगिरी करु शकतो अशी शक्यता आहे.
‘बॅड न्यूज’चे कथानक?
तृप्ती डिमरी ही गरोदर असून तिच्या पोटात जुळी मुले आहेत आणि त्या मुलांचे दोन वडील आहेत ते म्हणजे विकी कौशल आणि एमी विर्क असे रंगतदार विनोदी कथानक आहे.