कोल्हापुरातील नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील यांच्या सह तीन नृत्यांगनानी जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्प वर भरतनाट्यम् नृत्य सादर करण्याचा नवीन उपक्रम केला आहे.. कोल्हापूरमधून १७ ध्येयवेडे एव्हरेस्ट बेस कॅम्प (१७,६५० फूट) आणि काला पत्थर (१८,२०० फूट) मोहिमेसाठी २३ ऑक्टोबर रोजी रवाना झाले होते.यांमध्ये कोल्हापूरमधील नामांकित डॉक्टर, व्यावसायिक, कलाकार होते.या ट्रेकमध्ये एव्हरेस्ट बेस्ट कॅम्पच्या या प्रवासामध्ये एकूण तीन वेळेला भरतनाट्यम् सादर करण्यात आलं.थेँगबोचे मॉनेस्ट्री (१३,००० फूट), एव्हरेस्ट बेस कॅम्प (१७,६५० फूट) आणि काला पत्थर (१८,२०० फूट) या ठिकाणी भारतीय शास्त्रीय नृत्य असणाऱ्या भरतनाट्यम या नृत्यकलेतून सादर करून एव्हरेस्टला मानवंदना दिली गेली.. गुरु नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील आणि त्यांच्यासोबत त्यांच्या शिष्या दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजल दळवी या ही सहभागी होत्या.. तेंगबोचे येथे चौघींनी गणपती स्तुती सादर केली, त्यानंतर काला पठार येथे शिव श्लोक सादर केला गेला आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प येथे पहिल्यांदा संयोगिता पाटील यांनी ६ मिनिटांचा श्रीराम स्तुती श्लोक सादर केला आणि त्यानंतर चौघींनी पावणे सात मिनिटांची भज गोविंदम ही कृष्ण वंदना सादर केली आणि त्याला जोडून सर्वांचे मंगल व्हावे या भावनेने मंगलम् सादर केले..एवरेस्ट बेस्ट कॅम्प सर करत असताना वाटेमध्ये तापमानामध्ये चढ उतार होत होता आणि गोठवणारी थंडी होती.. त्याचबरोबर सलग पाच दिवस झालेली बर्फवृष्टी, यामध्ये भरतनाट्यम सादर करणे हे जगामध्ये पहिल्यांदाच झाले आहे..