बॉलिवूडमधील दिग्गज जोडपं असलेलं धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. मागील काही काळापासून दोघांमध्ये घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
एकीकडे सिनेसृष्टीत सध्या लग्नसराईचा सिझन चालू आहे. मराठी हिंदी सिनेसृष्टीत अनेक अभिनेता अभिनेत्री लग्नगाठ बांधताना दिसत आहे तर दुसरीकडे कित्येकांचा सुरू असलेला संसार मोडत आहे. सध्या बॅालिवूडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूडमधील दिग्गज जोडपं असलेलं धर्मेंद्र (Dharmendra) आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांची मुलगी ईशा देओलने (Esha Deol) घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या 11 वर्षानंतर ईशाने काडीमोड घेतला आहे. याची माहिती ईशानं स्वत सोशल मीडियावर दिली.
[read_also content=”मध्यप्रदेशमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट,11 जणांचा मृत्यू तर 100 हून अधिक जखमी;मालकासह तीन आरोपींना अटक https://www.navarashtra.com/india/11-people-died-and-more-than-100-injured-in-fire-at-madhya-pradesh-fire-crackers-factory-nrps-505117.html”]
ईशा देओल पती भरत तख्तानीपासून घेणार घटस्फोट
गेल्या अनेक दिवसापासून अभिनेत्री ईशा देओल आणि तिचा पती भरत तख्तानी दोघ घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर त्या बातमीवर आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दोघांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. ईशा देओल आणि तिचा पती भरत तख्तानी यांनी संयुक्तपणे एक निवेदन जारी करत याची माहिती दिली आहे. या निवेदनात दोघांनी म्हटले आहे की, ‘आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या जीवनातील हा बदल आपल्या आणि आपल्या मुलांच्या दोघांच्या हिताचा आहे आणि तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आमच्या गोपनीयतेचा आदर केला जाईल याची आम्हाला अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले.