सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनी प्रेक्षकांचं सातत्याने मनोरंजन करते आहे. आता या वाहिनीवर १८ जुलैपासून प्रेक्षकांना एक नवी कोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ (Jivachi Hotiya Kahili) ही मराठी आणि कानडी यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. या मालिकेत दोन दिग्गज अभिनेते आमनेसामने असणार आहेत. अस्सल कोल्हापुरी वेशात अभिनेते विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi) तर कानडी तडका द्यायला अभिनेते अतुल काळे (Atul Kale) असणार आहेत.
[read_also content=”गुजरातमध्येही सतंतधार! आतापर्यंत ६३ जणांनी गमावला जीव https://www.navarashtra.com/india/continuous-in-gujarat-too-so-far-63-people-have-lost-their-lives-nrps-303366.html”]
मालिकेची झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पहिल्या झलकमध्ये प्रेमाला भाषा नसते हे दिसलं तर कानडी आणि मराठीचा झकास तडका दुसऱ्या वेळेस बघायला मिळाला. यात आकर्षण ठरलेत नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकार. अर्थातच विद्याधर जोशी आणि अतुल काळे. हे दोन्ही दिग्गज कलाकार नव्या भूमिकांत, नव्या वेशात प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत.
बिनधास्त, स्वप्नाळू, चंचल अशी ही रेवथी!
पिरती दोघांची भाषेपलीकडची!
नवी मालिका – ‘जिवाची होतिया काहिली’.
18 जुलैपासून, सोम – शनि, संध्या. 7:30 वा.
सोनी मराठी वाहिनीवर. #जिवाचीहोतियाकाहिली। #JivachiHotiyaKahili#सोनीमराठी | #SonyMarathi#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati pic.twitter.com/BonwR7wmV0— Sony मराठी (@sonymarathitv) July 11, 2022
विद्याधर जोशी यांचा अस्सल कोल्हापुरी वेश तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख प्रेक्षकांना आवडतो आहे. कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे. आणि त्यातही त्यांच्यातलं होणारं चुरसदार भांडण आणि घरातल्या घरातच मारली जाणारी सीमारेषा प्रेक्षकांना अवाक करत आहे. हे भांडण रेवथी आणि अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम करेल, या कलाकारांचं ऑनस्क्रीन चुरसदार भांडण, उडणारे खटके आणि त्यांचा स्वतःचा असा एक भाषेचा ठसका प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही. या दोघांमुळे रेवथी आणि अर्जुन यांची प्रेमकहाणी कोणतं नवं वळण घेणार ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे.
या मालिकेत या दिग्गज कलाकरांबरोबर अभिनेत्री सीमा देशमुख आणि भारती पाटील यादेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. विद्याधर जोशी आणि अतुल काळे यांच्या जोडगोळीचं ऑन स्क्रीन चुरसदार भांडण १८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर ‘जिवाची होतिया काहिली’ या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.