• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Painter And Poet Baba Pawar Expressed The Plight Of Farmers Through His Poetry

‘औंदा ह्यो पाऊस…’, शेतकऱ्यांच्या वेदनांचा कडवा हुंकार; कवी बाबा पवारांचा सडेतोड प्रहार

मुक्या जनावरांची झालेली फरफट आणि सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनांचा उघडा फोलपणा बाबा पवार यांनी आपल्या कवितेतून मांडला आहे. यातून शेतकरी, कष्टकरी, ग्रामीण समाज आणि सर्वसामान्य माणसाच्या वेदनांची जाहीर साक्ष ठरते.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 31, 2025 | 06:07 PM
Painter and poet Baba Pawar expressed the plight of farmers through his poetry

चित्रकार व कवी बाबा पवार यांनी कवितेतून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कराड : राजेंद्र मोहिते : अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेली वस्ती, उघड्यावर आलेला शेतकरी, मुक्या जनावरांची झालेली फरफट आणि सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनांचा उघडा फोलपणा या साऱ्या विदारक वास्तवावर कराड तालुक्यातील विंग येथील चित्रकार व कवी बाबा पवार यांनी आपल्या सडेतोड कवितेतून कडवा हुंकार दिला आहे. “औंदा ह्यो पाऽऊस, यळआधी असा कसा…” या प्रभावी शीर्षकाच्या कवितेतून त्यांनी निसर्गाच्या रौद्रतेइतकीच राजकीय व्यवस्थेची असंवेदनशीलताही निर्भीडपणे उघडी पाडली आहे. ही कविता केवळ शब्दांची मांडणी नसून, शेतकरी, कष्टकरी, ग्रामीण समाज आणि सर्वसामान्य माणसाच्या वेदनांची जाहीर साक्ष ठरते.

विंग या छोट्याशा गावचे रहिवासी असलेले बाबा पवार हे हाडाचे चित्रकार तर आहेतच, पण तितकेच संवेदनशील आणि समाजभान जपणारे कवीही आहेत. सेवानिवृत्त कलाशिक्षक असलेल्या पवार यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात अनेक कलाकार घडवले. १९८२ पासून त्यांनी कुंचल्यातून साकारलेली असंख्य पेंटिंग्ज अनेक संस्था, मान्यवरांकडे असून, त्यांना अनेक मानाचे पुरस्कारही लाभले आहेत. गेल्या १७ वर्षांपासून पवार यांनी एक आगळा-वेगळा, समाजप्रबोधनाचा उपक्रम सुरू ठेवला आहे. मावळत्या वर्षाला निरोप आणि उगवत्या वर्षाचे स्वागत करताना ते चित्र आणि कवितेच्या माध्यमातून संदेश देणारी शुभेच्छापत्रे तयार करतात. या अनोख्या उपक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक, एशिया बुक आणि इंडिया बुक अशा वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये घेण्यात आली आहे.

हे देखील वाचा : भाजपाकडून निष्ठावंत बेदखल! ऐनवेळी शिंदे शिवसेनेत, राष्ट्रवादीत अनेकांनी केला प्रवेश

यंदा २०२५ या वर्षाला निरोप देत आणि २०२६ चे स्वागत करताना त्यांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या चित्राला “व्यथा” या सशक्त कवितेतून शब्दरूप दिले आहे. गतवर्षी त्यांनी “दुनिया लै बदालल्या… आपलंच आपल्याला छळतंय” या चित्ररूपी काव्यातून समाजाची व्यथा मांडली होती.

यावर्षीच्या चित्ररूपी कवितेत अवकाळी, उधळणारा पाऊस केवळ शेतीच नव्हे, तर गरीबांचा संसार, कष्टकऱ्यांची आश्रय-उपजीविका आणि मुक्या जनावरांचे जीवही वाहून नेतो, हे विदारक वास्तव प्रभावी शब्दांत मांडले आहे. पावसाने अनेकांना पोरकं केलं, संसार उद्ध्वस्त केला; मात्र मदतीच्या नावाखाली येणारे नेते पाहणी, फोटोसेशन आणि कोरड्या आश्वासनांपुरतेच मर्यादित राहतात, असा बोचरा टोला कवीने लगावला आहे.

“सातबारा कोरा तुमचा, करणार आम्ही वादा आमचा” अशा घोषणा दिल्या जातात; मात्र प्रत्यक्षात शेतकरी, मजूर, कष्टकरी यांच्या हाती काहीच लागत नाही. पक्षांतर, खुर्ची वाचवण्याचं राजकारण, निवडणुकीपुरती मतांची आठवण आणि पाच वर्षांनी पुन्हा ऐकू येणारी आश्वासनं या साऱ्यावर कवीने उपरोधिक, पण अत्यंत तीव्र शब्दांत प्रहार केला आहे.

नेते बदलतात, झेंडे बदलतात; पण सामान्य माणसाचं नशीब बदलत नाही. थोड्या दिवसांची चैन आणि नंतरची उपासमार हीच त्याची नियती का, असा थेट सवाल उपस्थित करत कवी बाबा पवार लोकांना डोळसपणे जागं राहण्याचं आवाहन करतात. ही कविता साहित्यिक चौकटीपलीकडे जाऊन, निसर्ग आणि सत्तेच्या दुहेरी मारात भरडल्या जाणाऱ्या समाजाचा आक्रोश ठरते. बाबा पवार यांच्या शब्दांतून हा आक्रोश थेट काळजाला भिडतो.

हे देखील वाचा : ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये राज ठाकरेंवर अन्याय? आरोप होताच संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

औंदा ह्यो पाऽऊस, यळआधी असा कसा, उधळतऽ गरजतऽ आला, कितीक दिवस त्योऽऽ, वस्तीला ऱ्हाहूनऽ, ज्याऽऽम बदडून गेला ।। धुऽ धूऽ धुतलं पुन्हा, मिठीत वडून घ्येतलं त्येनं, कितीतरी पोरकी केली. हंऽबर्डा फोडून बसल्या जाग्याव तडपाऽडून किती, मुकीपण जीवानीशी गेली. पोशिंद्याला उघडा पाडून, सैर-भैर करुन त्येच्या, संसाराचा चिकूऽल केला. औंदा ह्यो पाऽऊस, यळआधी असा कसा, ….।।१।।

चित्रकार व कवी बाबा पवार म्हणाले की, “चित्र आणि कवितेच्या माध्यमातून समाजाशी संवाद साधण्याचा हा उपक्रम गेली सतरा वर्षे सातत्याने राबवत आहे. या उपक्रमाची दखल अनेक महाराष्ट्रभर साहित्यिक, जाणकारांनी घेतली आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मिळालेली पुरस्कारांची मान्यता आणि जाणकार रसिकांचे प्रेम हीच माझी खरी प्रेरणा आहे. समाजातील वास्तव, वेदना आणि प्रश्न कलेतून मांडत राहणं, हीच माझी भूमिका आहे”

Web Title: Painter and poet baba pawar expressed the plight of farmers through his poetry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 06:07 PM

Topics:  

  • daily news
  • Karad news
  • kolhapur news

संबंधित बातम्या

श्री महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरील अतिक्रमणे हटवली जाणार; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण आदेश
1

श्री महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरील अतिक्रमणे हटवली जाणार; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण आदेश

पोलिसांचंही बँक खातं नाही सुरक्षित ! सायबर चोरट्यांनी तब्बल साडेआठ लाखांना घातला गंडा
2

पोलिसांचंही बँक खातं नाही सुरक्षित ! सायबर चोरट्यांनी तब्बल साडेआठ लाखांना घातला गंडा

कोल्हापूरच्या गारगोटी-कडगाव रस्त्यावर ‘बर्निंग कार’चा थरार; आगीत कार जळून खाक
3

कोल्हापूरच्या गारगोटी-कडगाव रस्त्यावर ‘बर्निंग कार’चा थरार; आगीत कार जळून खाक

Satara News : वाढत जाणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण? ठेकेदारांचा हलगर्जीपणा बेततोय नागरिकांच्या जीवावर
4

Satara News : वाढत जाणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण? ठेकेदारांचा हलगर्जीपणा बेततोय नागरिकांच्या जीवावर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘औंदा ह्यो पाऊस…’, शेतकऱ्यांच्या वेदनांचा कडवा हुंकार; कवी बाबा पवारांचा सडेतोड प्रहार

‘औंदा ह्यो पाऊस…’, शेतकऱ्यांच्या वेदनांचा कडवा हुंकार; कवी बाबा पवारांचा सडेतोड प्रहार

Dec 31, 2025 | 06:07 PM
Maharashtra Politics : भाजपाकडून निष्ठावंत बेदखल! ऐनवेळी शिंदे शिवसेनेत, राष्ट्रवादीत अनेकांनी केला प्रवेश

Maharashtra Politics : भाजपाकडून निष्ठावंत बेदखल! ऐनवेळी शिंदे शिवसेनेत, राष्ट्रवादीत अनेकांनी केला प्रवेश

Dec 31, 2025 | 05:58 PM
IND W vs SL W : दीप्ती शर्माने गाजवले 2025 हे वर्ष! ‘या’ विक्रमासह प्रस्थापित केला खास दबदबा 

IND W vs SL W : दीप्ती शर्माने गाजवले 2025 हे वर्ष! ‘या’ विक्रमासह प्रस्थापित केला खास दबदबा 

Dec 31, 2025 | 05:45 PM
Maharashtra Politics : अखेर परभणीतही भाजपा-सेना युती तुटली; भाजपने युती तोडल्याचा जोरदार आरोप

Maharashtra Politics : अखेर परभणीतही भाजपा-सेना युती तुटली; भाजपने युती तोडल्याचा जोरदार आरोप

Dec 31, 2025 | 05:45 PM
महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद

Dec 31, 2025 | 05:43 PM
रिलीज होऊन 26 दिवस झाले तरी ‘Dhurandhar’ पाहण्यासाठी तरसतोय बॉलिवूडचा ‘हा’ स्टार; जाणून घ्या काय आहे कारण?

रिलीज होऊन 26 दिवस झाले तरी ‘Dhurandhar’ पाहण्यासाठी तरसतोय बॉलिवूडचा ‘हा’ स्टार; जाणून घ्या काय आहे कारण?

Dec 31, 2025 | 05:36 PM
Bharat Taxi App: आता Ola-Uber ला विसरा; कारण, केंद्र सरकार सुरू करणार आहे ‘ही’ टॅक्सी 

Bharat Taxi App: आता Ola-Uber ला विसरा; कारण, केंद्र सरकार सुरू करणार आहे ‘ही’ टॅक्सी 

Dec 31, 2025 | 05:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Dec 31, 2025 | 03:52 PM
Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Dec 31, 2025 | 02:26 PM
Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Dec 31, 2025 | 02:22 PM
Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Dec 30, 2025 | 08:09 PM
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Dec 30, 2025 | 07:48 PM
Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Dec 30, 2025 | 07:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.