मुंबई : ‘बिग बॉस १५’ (Bigboss 15) फेम करण कुंद्राची (karan kundra) लव्हलाईफ खूपच इंटरेस्टिंग आहे. पहिलं करणचं नाव जुळलं गेलं ते कृतिका कामरासोबत. (Krutika kamara) कृतिका आणि करणची आधी मैत्री झाली नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघं एकमेकांच्या प्रेमात होते. पण फार काळ हे नातं टिकलं नाही. त्या दोघांचं ब्रेकअप झालं. पण ब्रेकअपनंतरही करण आणि कृतिकामध्ये मैत्री कायम राहिली. एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत कृतिका म्हणाली की, एक्स बॉयफ्रेन्ड-गर्लफ्रेन्ड हे ब्रेकअप नंतर चांगले मित्र म्हणून का राहू शकत नाहीत? त्यामुळे आजही माझी आणि करणची चांगली मैत्री आहे.
कृतिकानंतर करणच्या आयुष्यात आली ती अनुष्का दांडेकर. (Anushka Dandekar) हा मराठमोळा चेहरा करणच्या ‘दिल की धडकन’ बनली. करण आणि अनुष्का डेट करू लागले. दोघांना डिनरला, पार्टीला एकत्र पाहण्यात आलं. पण अनुष्काशीही करणचं कालांतरणाने ब्रेकअप झालं. 2019 मध्ये अनुष्का आणि करणचे ब्रेकअप झाले होते. अनुष्काने ब्रेकअपनंतर करण कुंद्रावर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर करण गौहर खानबरोबर (Gauhar khan) रिलेशनशीपमध्ये होता. तर बिग बॉस हाऊसमध्ये करण आणि तेजस्वी प्रकाशमध्ये (Tejasswi prakash) हळुवार प्रेमाचं नातं फुलतानाही प्रेक्षकांनी स्मॉल स्क्रीनवर पाहिलं.