सध्या अभिनेता कार्तिक आर्यन खूप चर्चेत आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित चंदू चॅम्पियनचा (chandu champion trailer ) ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता खूप वाढली आहे. फॅन्सपासून ते सेलेब्रिटीपर्यंत प्रत्त्येक जण कार्तिक आर्यनच्या अभिनयाचं कौतुक करताना दिसत आहे.
[read_also content=”स्वत: तयार केलेला ड्रेस घालून दिल्लीची ‘ही’ फॅशन इन्फ्लुएंसर पोहोचली कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये! https://www.navarashtra.com/movies/who-is-nancy-tyagi-indian-fashion-influencer-who-made-cannes-2024-debut-in-self-stitched-gown-nrps-535097.html”]
कसा आहे ट्रेलर
तीन मिनिटे 15 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये कार्तिकचा दमदार अभिनय दिसत आहे. त्यानं त्याच्या भूमिकेवर केलेली मेहनत स्पष्टपणे दिसून येत आहे. या चित्रपटासाठी त्याने अप्रतिम बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. ट्रेलरमध्ये 1965 च्या युद्धाची झलकही दाखवण्यात आली आहे. लष्करातील शिपाई मुरली पेटकरच्या भूमिकेत कार्तिक दिसत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच युद्धात नऊ वेळा गोळी लागल्याने तो दोन वर्षांपासून कोमात असल्याचे सांगण्यात दाखवण्यात आलं आहे. यानंतर चंदूच्या पुर्वआयुष्यातील अनेक प्रसंग दाखवले आहेत.
ट्रेलरमध्ये चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी खूपच जबरदस्त दिसत आहे. हे पाहिल्यानंतर लोकांना चित्रपटात चांगली दृश्ये पाहायला मिळतील अशी आशा बाळगता येईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. याआधी त्याने एक था टायगर आणि बजरंगी भाईजान सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट केले होते.
कधी होणार रिलीज
प्रसिद्ध संगीतकार प्रीतम यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. याआधी प्रीतमने कबीर खानच्या बजरंगी भाई जान आणि फँटम सारख्या चित्रपटांमध्येही हिट गाणी दिली होती. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला आणि कबीर खान यांनी केली आहे. हा चित्रपट 14 जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
Web Title: Kartik aryan starrer chandu champion trailer releases nrps