Instamart Quick India Movement, भारतातील सर्वात जलद सेल 19 सप्टेंबरपासून होणार सुरू (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Swiggy Instamart Quick India Movement Marathi News: खरेदीतील सोयीसाठी कधीही न झालेल्या अशा अनोख्या सेलिब्रेशनमध्ये, भारतातील आघाडीचे क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इंस्टामार्टने आज आपल्या पहिल्या इंस्टामार्ट क्विक इंडिया मूव्हमेंट 2025 वार्षिक मेगा सेलची आणि भारतातील सर्वात जलद सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना जलद डिलिव्हरीसोबत रोमांचक ऑफर्स मिळणार असून खरेदीचा अनुभव एकदम नवा ठरणार आहे. हा सेल 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान इंस्टामार्ट अॅप आणि स्विगी अॅपवर लाईव्ह होणार आहे.
ग्राहकांना 50% ते 90% पर्यंतच्या जबरदस्त सवलती मिळणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, किचन आणि डायनिंग, ब्युटी आणि पर्सनल केअर, खेळणी आणि इतर अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात दरकपात करण्यात आली आहे, आणि ही सर्व उत्पादने फक्त 10 मिनिटांत डिलिव्हर केली जाणार आहेत. 50,000 हून अधिक उत्पादनांच्या ऑफर्ससह, इंस्टामार्ट सणासुदीच्या खरेदीला नव्या रूपात सादर करत असून, क्विक कॉमर्सच्या वेग आणि सोयीसह हंगामातील सर्वात मोठ्या ऑफर्स ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे.
बचत अधिक करण्यासाठी, ग्राहकांना सर्व अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड्सवर त्वरित 10% सूट, जास्तीत जास्त 1000 रुपये पर्यंत मिळणार आहे.
बोट, फिलिप्स, बर्गनर, पॅम्पर्स यांच्या भागीदारीत आणि एर्विक व नेस्तासिया यांच्या सहयोगाने ग्राहकांसाठी आणलेला क्विक इंडिया मूव्हमेंट सेल भारतातील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह ब्रँड्स अविश्वसनीय किमतीत आणि विविध कॅटेगरीजमध्ये घेऊन येत आहे.
मोबाईल्स, प्रोजेक्टर, वनप्लस, ओप्पो, शाओमी, पोको आणि रिअलमीसारख्या लोकप्रिय स्मार्टफोन्सवर ब्लॉकबस्टर डील्स तसेच बोट, जेबीएल, फिलिप्स, रिअलमी, गोबोल्ट, लाइफलाँग, न्यू रिपब्लिक, नॉइज, पोर्ट्रॉनिक्स, मार्शल आणि इतर ब्रँड्सच्या गॅजेट्स व उपकरणांवर सुद्धा खास ऑफर्स.
स्टाईलपासून ते फंक्शनॅलिटीपर्यंत, डी’डेकॉर, सेलो, प्रेस्टिज, बर्गनर, नेस्तासिया, बोरोसील आणि स्कॉच ब्राईट सारख्या आघाडीच्या ब्रँड्सवर मोठ्या सवलती मिळणार आहेत. ब्लॉकबस्टर ऑफर्समध्ये एअर फ्रायर्स, प्रीमियम लिनेन सेट्स, डिनर सेट्स, क्लिनिंग एसेंशियल्स आणि इतर अनेक उत्पादने उपलब्ध असतील.
दररोजच्या पर्सनल केअर आवश्यक वस्तूंवर अप्रतिम ऑफर्स उपलब्ध असतील. लॉरिअल पॅरीस, पॅम्पर्स, फिलिप्स, हिमालया, निव्हिया आणि डव्ह यांसारख्या नामांकित ब्रँड्सवर खास सवलती मिळणार आहेत.
या सेलमध्ये दैनंदिन वापरातील वस्तूंवरही आकर्षक ऑफर्स मिळतील. एरियल, आशीर्वाद, एर्विक आणि मॉर्टिन यांसारखे आघाडीचे ब्रँड्स उपलब्ध असतील. सणासुदीच्या खरेदीचा आनंद दुप्पट करण्यासाठी फेरेरो रॉजर, हल्दीराम, केलॉग्ज, इंडिया गेट, द व्होल ट्रूथ यांसारख्या ब्रँड्सवर आणि ऑरिगामी कडील घरगुती आवश्यक वस्तूंवरही जबरदस्त डील्स मिळणार आहेत, ज्यामुळे या सणासुदीत सोय आणि उत्सव दोन्ही एकत्र अनुभवता येतील.
सणाच्या उत्साहात भर घालत, ग्राहकांना बार्बी, लिगो आणि मोनोपॉली सारख्या कुटुंबातील लाडक्या टॉय ब्रँड्सवर खास डील्स मिळतील. यामुळे क्विक इंडिया मूव्हमेंट सणासुदीच्या गिफ्टिंगसाठी आणि फॅमिली एंटरटेनमेंटसाठी एकाच ठिकाणी सर्व काही मिळवून देणारे ठिकाण ठरणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक इनोव्हेशनच्या आधारावर, या सेलमध्ये प्रत्येक डील इंस्टामार्ट ग्राहकांना अपेक्षित असलेल्या अतिवेग आणि विश्वासार्हतेसह डिलिव्हर केली जाणार आहे. फक्त सणासुदीपुरत्या ऑफर्सपुरतेच नव्हे, तर इंस्टामार्ट क्विक इंडिया मूव्हमेंट प्रत्येकासाठी सोय, निवड आणि किफायतशीरपणा त्वरित उपलब्ध करून देणार आहे.