म्यानमारच्या राखीन प्रांतात भीषण युद्ध, ३ आघाड्यांवर लष्कर आणि अराकान आर्मी आमनेसामने ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Myanmar Conflict : भारताच्या सीमेपासून काही अंतरावर असलेल्या म्यानमारच्या राखीन प्रांतात पुन्हा एकदा भीषण युद्ध पेटले आहे. २०२१ मध्ये सुरू झालेल्या यादवी संघर्षाने आता निर्णायक टप्पा गाठला असून, अराकान आर्मी (एए) आणि लष्करी जुंटा तीन आघाड्यांवर थेट आमनेसामने आले आहेत. या युद्धामुळे केवळ म्यानमारच नव्हे, तर शेजारील देशांसह भारतालाही तणाव वाढला आहे.
म्यानमारच्या लष्करी जुंटाने पश्चिमेकडील राखीन राज्यात अराकान आर्मीला मागे ढकलण्यासाठी तीन आघाड्यांवर सैन्य पाठवले आहे. परंतु एएने आपला विस्तार वेगाने वाढवत लढाई तीव्र केली आहे. ‘इरावती’च्या अहवालानुसार, राखीनवर मोठा ताबा मिळवल्यानंतर एएने शेजारील मॅग्वे, बागो आणि अय्यरवाडी प्रांतांमध्ये हालचाली वाढवल्या आहेत. गेल्या आठवड्यात मॅग्वेच्या न्गापे टाउनशिपमधील सुम टाट गावाजवळ दोन बटालियनच्या सरकारी तुकडीसोबत दोन तासांची भयंकर झुंज झाली. एएचा दावा आहे की, या लढाईत सरकारी सैन्याला शस्त्रे, दारुगोळा, उपकरणे टाकून माघार घ्यावी लागली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Gen ZProtest : 18 जणांचा मृत्यू, शंभरहून अधिक जखमी; नेपाळमध्ये PM ओलींनी बोलावली आपत्कालीन बैठक
राखीनमधील क्युकफ्यू या रणनीतिक शहरात संघर्ष अधिक वाढला आहे. इथे चीन समर्थित खोल समुद्रातील बंदर, विशेष आर्थिक क्षेत्र, तसेच तेल आणि वायू पाइपलाइन सुरू आहेत. यामुळे या भागातील घडामोडींवर चीनसह भारताचेही लक्ष केंद्रीत झाले आहे. बागो प्रदेशातही संघर्षाचे स्वरूप गंभीर झाले आहे. पडाँग टाउनशिपमध्ये एएच्या नियंत्रणाखालील भागात १,५०० पेक्षा जास्त जुंटा सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तर अय्यरवाडीच्या लाम्येथना टाउनशिपमध्ये एएकडून गमावलेला प्रदेश पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात जुंटा गुंतले आहे.
In Kawkareik, where the Junta has “thrown everything” at reopening a road captured by the Resistance in late 2023, “The 90-day campaign launched in early August to reclaim the Kawkareik-Myawaddy road remains stalled near the outskirts of Kawkareik town.”https://t.co/avCyoSTsGd… pic.twitter.com/AQzOZMbqeg
— Nathan Ruser (@Nrg8000) September 5, 2025
credit : social media
एए ही फक्त एक प्रादेशिक बंडखोर संघटना राहिलेली नाही, तर म्यानमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मी (MNDAA) आणि ता’आंग नॅशनल लिबरेशन आर्मी (TNLA) सोबतची ‘ब्रदरहुड अलायन्स’ची एक महत्त्वाची कडी बनली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू केलेल्या ऑपरेशन १०२७ अंतर्गत एएने काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर भूभाग आपल्या ताब्यात घेतला. यामध्ये उत्तर शान राज्याचा बहुतांश भाग, मंडाले प्रदेशातील मोगोके, तसेच त्यांच्या मूळ राखीन राज्यातील १७ पैकी तब्बल १४ टाउनशिपचा समावेश आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Data Leak : 500 रुपयांना लोकेशन, 2000 रुपयांना मोबाईल रेकॉर्ड! पाकिस्तानात भीषण डेटा लीक; मंत्र्यांपर्यंत माहिती विक्रीला
राखीन राज्य भारताच्या ईशान्य सीमेजवळ असल्यामुळे या संघर्षाचा थेट परिणाम भारतावर होऊ शकतो. शेकडो निर्वासित सीमापार येत आहेत. चीनसाठी क्युकफ्यूमधील प्रकल्प निर्णायक आहेत, तर भारतालाही त्रिपुरा व मिजोराममार्गे होणाऱ्या अस्थिरतेचा धोका आहे. युद्धाचा हा विस्तार पाहता, तज्ञांच्या मते “म्यानमारमध्ये काहीतरी मोठे घडणार आहे” अशी चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. जुंटा कमकुवत होत असताना एए आपली ताकद वाढवते आहे. यामुळे यादवी युद्धाचा समतोल पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.