Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Love and War’मध्ये विकी कौशलचा नवा अवतार! दोन दमदार पोस्टर्सनी वाढवली सिनेमाची उत्सुकता

Love and War: संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षित ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटातील विकी कौशलचा फर्स्ट-लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल पहिल्यांदाच भन्साळी यांच्या भव्य चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 26, 2026 | 05:00 PM
‘Love and War’मध्ये विकी कौशलचा नवा अवतार! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

‘Love and War’मध्ये विकी कौशलचा नवा अवतार! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘लव्ह अँड वॉर’मधील विकी कौशलचा फर्स्ट-लुक पोस्टर रिलीज.
  • सिगारेट, लायटर आणि तीव्र नजरेतील विकीचा दमदार अंदाज.
  • रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल पहिल्यांदा भन्साळींच्या चित्रपटात एकत्र.
संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित ‘लव्ह अँड वॉर’ हा वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असून, भारतीय चित्रपटसृष्टीत नवा मापदंड प्रस्थापित करण्यासाठी सज्ज आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल हे तीन आघाडीचे कलाकार पहिल्यांदाच एका भव्य एसएलबी चित्रपटासाठी एकत्र येत असल्याने, हा चित्रपट एक आगळावेगळा सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.  Love and War

वादळ निर्माण करत प्रेक्षकांचे भरभरून प्रेम

चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच, निर्मात्यांनी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे फर्स्ट-लुक पोस्टर्स प्रेक्षकांसमोर आणले होते. या पोस्टर्सनी सोशल मीडियावर अक्षरशः वादळ निर्माण करत प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले. आता विकी कौशलचा फर्स्ट-लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला असून, त्याचा हा लुक पाहून प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले आहेत.

दमदार उपस्थिती दिली

हातात सिगारेट आणि लायटर, चेहऱ्यावर तीव्र नजर आणि व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच धार — विकी कौशल आपल्या फर्स्ट लुकमध्ये अत्यंत प्रभावी दिसत आहे. या व्यक्तिरेखेला त्याने एक वेगळीच धार आणि दमदार उपस्थिती दिली आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अशा अंदाजात विकी कौशल दिसत असून, त्याचा हा लुक निश्चितच लक्ष वेधून घेतो. पोस्टर सर्व काही सांगून जाते.

Chikizing Marathi Movie: ‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं! ‘या’ तारखेला रंगणार एका छोट्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट!

एखादा कलाकार जेव्हा भन्साळींच्या नायकाच्या विश्वात प्रवेश करतो, तेव्हा तो एका अनपेक्षित आणि वेगळ्याच रूपात समोर येतो. विकीचा हा लुक याच गोष्टीची साक्ष देतो. त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वासोबत त्याची तीव्र नजर जेव्हा एकरूप होते, तेव्हा एसएलबींच्या फर्स्ट लुकमधून निर्माण होणारी हीच ती जादू म्हणावी लागेल. निर्मात्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर विकी कौशलचा फर्स्ट-लुक पोस्टर शेअर करत लिहिले —

व्यक्तिरेखांमधील रंजक समीकरणांची झलक

रणबीर, आलिया आणि आता विकी — ‘लव्ह अँड वॉर’च्या तिन्ही फर्स्ट-लुक पोस्टर्सनी या चित्रपटाच्या विश्वाची तीन वेगवेगळी रूपं प्रेक्षकांसमोर आणली आहेत. प्रत्येक पोस्टरमध्ये एक वेगळी व्यक्तिरेखा, व्यक्तिमत्त्व आणि दृश्यभाषा पाहायला मिळते. विशेषतः विकीच्या पोस्टरमधून या चित्रपटाच्या विश्वाला एक जबरदस्त तीव्रता प्राप्त होते. त्यातून संजय लीला भन्साळी या चित्रपटाच्या माध्यमातून साकारत असलेल्या गुंतागुंतीच्या आणि थरारक विश्वाची तसेच व्यक्तिरेखांमधील रंजक समीकरणांची झलक पाहायला मिळते.

Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार एका माणसाची कहाणी; ‘बजरंगी’चं पोस्टर चर्चेत

‘लव्ह अँड वॉर’ हा संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट असून, यात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी जगभरात हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Love and war vicky kaushal first look poster sanjay leela bhansali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • aalia bhatt
  • Entertainement News
  • Marathi News
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Breaking News : Oracle च्या गोंधळाने AI बूमला धक्का; डेटा सेंटर क्षेत्राच्या तेजीचा नाजूक चेहरा समोर
1

Breaking News : Oracle च्या गोंधळाने AI बूमला धक्का; डेटा सेंटर क्षेत्राच्या तेजीचा नाजूक चेहरा समोर

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड
2

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड

Chikizing Marathi Movie: ‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं! ‘या’ तारखेला रंगणार एका छोट्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट!
3

Chikizing Marathi Movie: ‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं! ‘या’ तारखेला रंगणार एका छोट्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट!

US China -चीन-अमेरिकेतील व्यापारयुद्धाला ब्रेक? ३० अब्ज डॉलरच्या शुल्क कपातीवर सहमती; AI वरही चर्चा
4

US China -चीन-अमेरिकेतील व्यापारयुद्धाला ब्रेक? ३० अब्ज डॉलरच्या शुल्क कपातीवर सहमती; AI वरही चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.