Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घटस्फोटाच्या जखमाही अजून ताज्या मात्र माही विज प्रेमात? ‘I Love You’ म्हणत वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

प्रसिद्ध जोडी माही विज आणि जय भानुशाली यांनी अलिकडेच घटस्फोट घेऊन वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर माहीनेएक पोस्ट शेअर केली आहे, जी बरीच चर्चेत असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 11, 2026 | 12:39 AM
माहीने दिल्या नदीमला शुभेच्छा, जगासमोर व्यक्त केले प्रेम (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

माहीने दिल्या नदीमला शुभेच्छा, जगासमोर व्यक्त केले प्रेम (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • सलमान खानचा जवळचा मित्र नदीमला दिल्या माहीने खास पद्धतीने शुभेच्छा 
  • घटस्फोटाला आठवडाही उलटला नाही आणि कबूल केले नदीमवरील प्रेम 
  • मुलगी ताराच्या सोशल मीडिया पेजवरूनही केले घोषित 
टीव्हीवरील लोकप्रिय जोडी जय भानुशाली आणि माही विज यांनी त्यांचे १४ वर्षांचे नाते संपुष्टात आणले आहे. त्यांनी ४ जानेवारी रोजी संयुक्त निवेदनाद्वारे घटस्फोटाची घोषणा केली. तेव्हापासूनच हे जोडपे चर्चेत आहे. घटस्फोटानंतर माहीला ५ कोटी रुपयांची पोटगी मिळाल्याच्या अफवा पसरू लागल्या आणि अभिनेत्रीने या ट्रोलर्सना कडक शब्दांत उत्तर दिले. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी घटस्फोट घेतला आहे. 

मात्र माही विज पुन्हा एकदा जय भानुशालीशी घटस्फोट झाल्यामुळे नाही तर एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. टीव्ही अभिनेत्री माही विजने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचा चांगला मित्र नदीमसोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोतून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने फोटोला कॅप्शन देत लिहिले आहे की ती त्याच्यावर खूप प्रेम करते. हे वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

‘बँक अकाउंट खाली…’, माही विजने घटस्फोट आणि पोटगीवर व्यक्त केला राग, मुलांच्या संगोपनाबाबत सांगितली ‘ही’ गोष्ट

माहीने दिल्या नदीमला शुभेच्छा

माहीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नदीमला केक भरवतानाचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, “मी माझ्या हृदयापासून निवडलेल्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. जो मी एक शब्दही न बोलताही माझं ऐकतो, जो माझ्यासोबत असतो कारण त्याला तसं करायचं आहे, कर्तव्य म्हणून नाही – तूच माझं कुटुंब आहेस, माझं सुरक्षित ठिकाण आहेस, माझं सर्वस्व आहेस. तू फक्त माझा सर्वात चांगला मित्र नाहीस, तर तू माझा आधार, माझी ताकद, माझं घर आहेस. तुझ्यासोबत मी जशी आहे तशी राहू शकते – दुःखी, आनंदी, भावूक, अपूर्ण – आणि तरीही मला पूर्णपणे स्वीकारल्यासारखं आणि प्रेम मिळाल्यासारखं वाटतं.

हो, कधीकधी आपल्याला राग येतो. हो, आपण भांडतो. हो, कधीकधी आपण अनेक दिवस बोलत नाही. पण शांतता कितीही वाढली तरी, तिचा शेवट नेहमी एकाच ठिकाणी होतो – आपल्यात. कारण आतून, आपल्या दोघांनाही माहित आहे की नदीम आणि माही एकच आहेत. आपले आत्मे अशा प्रकारे जोडलेले आहेत की ते शब्दांत पूर्णपणे व्यक्त करता येणार नाही.

आयुष्य नेहमी सोपे नव्हते, पण तू माझ्यासोबत असल्यामुळे प्रत्येक गोष्ट हलकी, प्रत्येक गोष्ट मजबूत, प्रत्येक गोष्ट चांगली वाटते. जेव्हा मी कमजोर असते तेव्हा तू माझा हात धरतोस, जेव्हा मी स्वतःवर विश्वास ठेवायला विसरते तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवतोस, आणि तू माझ्यावर अशा प्रकारे प्रेम करतोस की माझ्या शरीराचे असे भाग बरे होतात जे तुटलेले आहेत हे मला माहितही नव्हते.

नदीम, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे – तू जसा आहेस त्यासाठीच नाही, तर तू मला जसं अनुभव देतोस, तू माझ्यासोबत कायम ज्या पद्धतीने उभा राहतोस, तू माझं हृदय, माझं घर, माझं कुटुंब आहेस त्यासाठी. आज आणि नेहमी खूप प्रेम

14 वर्षांचा संसार मोडला, Mahhi Vij ने जय भानुशालीकडून पोटगी, देखभालीचा खर्च नाकारला

कमेंट सेक्शन बंद 

माहीने नदीमच्या वाढदिवसाला त्याचा फोटो पोस्ट केलाय आणि याशिवाय मुलगी ताराच्या पेजवरूनही तिने ‘स्वीकारलेला अब्बा’ असे लिहीत फोटो पोस्ट केला आहे. दरम्यान यानंतर ट्रोलिंग होऊ शकते याची तिला पुरेपूर खात्री असल्याने तिने कमेंट सेक्शन बंद करून ठेवले आहे आणि आपल्या मनातील भावना संपूर्ण जगासमोर व्यक्त केल्यात. 

कोण आहे नदीम 

नदीमला आतापर्यंत बरेचदा मेगास्टार सलमान खानसह पाहण्यात आले आहे. नदीम हा सलमानच्या विश्वासातील आणि अत्यंत जवळचा असा मित्र आहे. त्याचा लहानपणापासूनचा मित्र असणारा नदीम बरेचदा अनेक कार्यक्रमांना त्याच्यासह दिसतो. याशिवाय सलमानच्या प्रॉडक्शन कंपनीचे कामही नदीम पाहतो. मात्र माही आणि नदीम यांच्या ही जवळीक कधी निर्माण झाली याबाबत अजूनही कोणतीही पुष्टी माहीने दिलेली नाही. दरम्यान आता माहीचा घटस्फोट याच कारणाने झाला असावा अशीही कुजबूज आता सोशल मीडियावर सुरू झालेली पहायला मिळतेय. 

Web Title: Mahhi vij divorced jay bhanushali after 14 years of marriage and posted her love for nadim within 1 week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 12:39 AM

Topics:  

  • Divorce
  • Entertainment News

संबंधित बातम्या

‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेवर National Crush गिरीजा ओक फिदा, सोशल मीडियावर केले कौतुक
1

‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेवर National Crush गिरीजा ओक फिदा, सोशल मीडियावर केले कौतुक

“एक-दोन महिन्यांत त्यांनी…” भोजपुरी गायक पवन सिंगने गुपचूप उरकले तिसरे लग्न? काकांनी सत्य केले उघड
2

“एक-दोन महिन्यांत त्यांनी…” भोजपुरी गायक पवन सिंगने गुपचूप उरकले तिसरे लग्न? काकांनी सत्य केले उघड

सुधा चंद्रनच्या खरोखरच अंगात आली होती देवी की केले ढोंग? नेटकऱ्यांनी केले ट्रोल, अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया
3

सुधा चंद्रनच्या खरोखरच अंगात आली होती देवी की केले ढोंग? नेटकऱ्यांनी केले ट्रोल, अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

अखेर शशांक केतकरने स्क्रिन शॉट्ससह केलं नाव जाहीर, 5 लाख बुडवणारा ‘हा’ मराठी निर्माता गोत्यात
4

अखेर शशांक केतकरने स्क्रिन शॉट्ससह केलं नाव जाहीर, 5 लाख बुडवणारा ‘हा’ मराठी निर्माता गोत्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.