शत्रू आपल्या घरात घुसला आहे पण त्यांचा सामना करण्यासाठी देशाचे शूरवीर तयार आहेत ? डिज्नी + हॉटस्टार तुमच्यासाठी ॲक्शन पॅक्ड मिलिटरी ड्रामा असलेली ‘शूरवीर’ (Shoorveer) ही वेब सीरिज घेऊन येत आहे. अलिकडेच ‘शूरवीर’च्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. ‘शूरवीर’मध्ये देशावर येणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी तीनही संरक्षक दलांचा समावेश असलेली, एक सुसज्ज तुकडी बनवण्यासाठीच्या रोमहर्षक प्रवासाचे चित्रण करण्यात आले आहे. जगरनॉट प्रॉडक्शन निर्मित, समर खान (Samar Khan) निर्मित आणि कनिष्क वर्मा (Kanishk Varma) दिग्दर्शित असून ही सीरिज डिज्नी+ हॉटस्टारवर (Disney+Hotstar) १५ जुलैला येत आहे.
अभिनेता मकरंद देशपांडे (Makarand Deshpande), मनीष चौधरी(Manish Chaudhari), रेजिना कॅसांड्रा, अरमान रल्हान, आदिल खान, अभिषेक साहा, अंजली बारोट, कुलदीप सरीन, आरिफ झकेरिया, फैसल रशीद, साहिल मेहता आणि शिव्या पठाणी हे दिग्गज कलाकार यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही कथा आपल्याला सैनिकांमधील मानवी संबंधांची कथा सांगते. यात ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे (Makarand Deshpande Interview) मुख्य भूमिकेत आहेत. त्यांनी त्यांच्या ऑन-स्क्रीन भूमिकेसाठी कशी मेहनत घेतली हे जाणून घेणे खरोखरच मनोरंजक आहे.
[read_also content=”‘राजीनामा’मध्ये पाहायला मिळणार खुर्चीसाठीचे राजकीय युद्ध, प्लॅनेट मराठीची नवी वेबसीरिज https://www.navarashtra.com/entertainment/planet-marathi-new-web-series-rajinama-is-coming-soon-nrsr-299532/”]
मकरंद देशपांडे या सीरिजबद्दल म्हणाले की, “हे पात्र साकारण्यासाठी, स्वभाव, शिस्त, कुशाग्र बुद्धिमत्ता, जबाबदार व्यक्तीमत्व राखण्यासाठी केवळ शारीरिक बदलां पुरतेच मर्यादित राहून चालणार नव्हते. या व्यक्तिरेखेसाठी आणखी बरेच काही करणे गरजेचे होते. अशी व्यक्तिरेखा साकारण्याची ही सर्वात मोठी कसोटी असते. कारण जेव्हा तुम्ही कमांडो असता तेव्हा तुम्ही स्वतःला त्यासाठी तयार करु शकता, मात्र जेव्हा तुम्ही बसलेले असता, निर्णय घेत असता तेव्हा तुम्हाला खरोखर जबाबदार व्यक्तीसारखे दिसण्याची गरज असते. हे एकप्रकारे स्वतःवर विश्वास ठेवण्यासारखे होते. मी म्हणेन की ही भूमिका साकारताना मी एक व्यक्ती म्हणून घडत गेलो. शूरवीरमधील माझ्या भूमिकेसाठी मला माझे दिग्दर्शक कनिष्क वर्मा, समर खान, लेखक मयंक आणि संपूर्ण क्रिएटिव्ह टीमची खूप मदत झाली.”