मल्याळम अभिनेता विजय बाबूवर (Vijay Babu) बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे. चित्रपटामध्ये काम देण्याच्या आमिषाने महिलेसोबत शारीरिक संबंध (Charge Of Sexual Assault On Vijay Babu) ठेवल्याचा आरोप विजयवर लावण्यात आला आहे. या घटनेने मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.
[read_also content=”किरीट सोमय्यांना झालेली जखम गंभीर आहे का ? वैद्यकीय तपासणीच्या अहवालातून मोठा खुलासा https://www.navarashtra.com/maharashtra/injury-to-kirit-somaiya-is-not-serious-medical-report-reveals-truth-nrsr-273593.html”]
वियज हा अभिनेत्यासोबतच एक निर्माता आणि उद्योजकही आहे. त्याच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने मनोरंजन क्षेत्राला धक्का बसला आहे. कोडीझोड भागात राहणाऱ्या पीडित महिलेने विजय बाबूविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या महिलेने तक्रार करत म्हटलं आहे, “चित्रपटांमध्ये काम देण्याच्या आमिषाने तिचं शारीरिक शोषण करण्यात आलं आहे”.
या पीडित महिलेने आपल्या तक्रारीमध्ये सांगितलं की, ‘कोचीत असलेल्या तिच्या फ्लॅटवर या अभिनेत्याने कामाचं आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले आहेत. दरम्यान २२ एप्रिल रोजी या अभिनेत्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे.”
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात अभिनेत्याची चौकशी केलेली नाही. विजय बाबूविरुद्ध बलात्कार आणि गंभीर प्रकारे शारीरिक इजा पोहोचवल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे. या अभिनेत्याचं ‘फ्रायडे फिल्म’ नावाचं प्रोडक्शन हाऊस आहे. विजय बाबूने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोबतच अनेक चित्रपटांची निर्मितीदेखील केली आहे.






