“सामान्य माणसांनी काय करायचं?”, हक्काच्याच घरासाठी शशांक केतकरला करावी लागतेय वणवण
मराठमोळा अभिनेता शशांक केतकर ह्याने ‘होणार सुन मी ह्या घरची’ मालिकेतून विशेष प्रसिद्धी मिळवली आहे. त्याने नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारा शशांक आपल्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेता कायमच सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत असतो. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्याने सोशल मीडियावरून एका व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय नेत्यांना प्रश्न विचारला आहे.
शशांक केतकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या शेअर केलेल्या व्हिडिओला कॅप्शन देत ती म्हणते, “सामान्य माणसानी काय करायचं??? कष्टाच्या पैशातून घर घेण्याचं स्वप्न पाहीलं… १२ वर्ष झाली, घर बूक करून.. लोन सुद्धा फेडून झालं, पण घरचा ताबा मिळण्याची शक्यताही अजून दिसत नाहीये. सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे. दर तारखेला..पुढची तारीख मिळते. पण तिथेही निकाल लागत नाही. झाडून सगळ्या राजकारण्यांकडे कसे मोठे बंगले आणि अनेक गाड्या असतात? आम्हा सामान्य जनतेला हे सिक्रेट सांगा ना! सांगा कसं जगायचं… (आनंदानी, अभिमानानी आणि समाधानानी) तुमच्या राजकारणापाई आम्ही का- मरा !”
पुन्हा प्लॅस्टिक सर्जरी केली का ? मौनी रॉयचा नवा लूक पाहून नेटकरी बुचकळ्यात…
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शशांक केतकर म्हणतो, “मिरा रोडला मी १२ वर्षांपूर्वी एक घर घेतलंय. ते अजून मला मिळालेलं नाहीये. कारण- त्यावर सरकारचं सील आहे. कोणाबद्दल आणि कशी कॉमेडी करू? कारण- एक तर ती बिल्डिंग पाडली जाईल आणि मला कोणीतरी बांधून देईल. काय करू? बँकेकडून अधिकृतरीत्या कर्ज घेतलं होतं. ते फेडून झालेलं आहे. पैसे भरून झालेले आहेत; पण घर मिळालं नाहीये. फक्त मुंबई, महाराष्ट्रातच नाही तर भारतात असे लाखो कॉम्प्लेक्स आहेत. जे उभे राहताना तिथे काहीतरी बेकायदा घडतंय, हे तिथल्या तिथल्या सरकारला कळत नाही? आमच्याकडून नोंदणीचे पैसे घेताना तुम्हाला हे कळत नाही? बँकांना कर्ज देताना हे कळत नाही? आमचे पैसे जातात, घर मिळत नाहीत. आता कॉमेडी करायची आहे. कोणाबद्दल आणि कशी कॉमेडी करू? सांगा ना?”
‘आता कोणताही सण…’ नमाजबाबत मेरठच्या निर्णयावर संतापला मुनव्वर फारुकी, नेमकं काय प्रकरण?
दरम्यान, अभिनेत्याने शेअर केलेला व्हिडिओ राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या अनेक प्रमुख नेत्यांना टॅग केलं आहे. आता अभिनेत्याने शेअर केलेल्या ह्या व्हिडिओवर राजकीय नेत्यांकडून कोणतं पाऊल उचललं जातंय ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अनेकांनी अभिनेत्याच्या मुद्द्याला आम्ही सहमत असल्याचं सांगितलं आहे. अनेकांनी आपआपल्या कमेंटही कमेंटबॉक्समध्ये लिहिलेल्या आहेत.