सलमानच्या हाती राम मंदिराचं चित्र असलेलं घड्याळ पाहून मौलाना संतापले
Maulana On Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने राम मंदिराचे चित्र असलेले घड्याळ घातले आहे. त्यामुळे मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी सध्या संतापले आहेत. यावेळी त्यांनी सलमानच्या घड्याळाला इस्लामविरोधी देखील घोषित केले. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान हे देशातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. तो एक प्रसिद्ध मुस्लिम आहे. त्याचे लाखो चाहते आहेत. राम मंदिराच्या प्रचारासाठी तो हातात राम मंदिराचे घड्याळ घालत आहे. कोणताही मुस्लिम हे करू शकत नाही.
ते पुढे म्हणाले की, जर सलमान खान राम मंदिर किंवा इतर कोणत्याही धर्माचा प्रचार करत असेल तर ते इस्लाममध्ये हराम आहे. अशा व्यक्तीने पश्चात्ताप करावा. गैर-इस्लामी तत्त्वांचा प्रचार करणे चुकीचे आहे. सलमानला मी सांगू इच्छितो की त्याने शरियतच्या तत्त्वांचे पालन करावे जेणेकरून त्याचे दैनंदिन जीवन शरियतनुसार असेल. हातात राम आवृत्ती घालणे आणि त्याचा प्रचार करणे म्हणजे गैर-मुस्लिमांना प्रोत्साहन देणे आहे. शरियानुसार हे हराम, असं त मौलान यांनी म्हटलं आहे.
#WATCH | Bareilly, UP: On Actor Salman Khan, President of All India Muslim Jamaat, Maulana Shahabuddin Razvi Bareilvi says, “Salman Khan is a very famous personality in India… Salman Khan has been seen wearing a Ram edition watch to promote Ram Mandir… If any Muslim, even if… pic.twitter.com/nCGSGhddLM
— ANI (@ANI) March 28, 2025
See you in theatres this Eid! pic.twitter.com/XlC2xFkIQ0
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 27, 2025
हे घड्याळ प्रसिद्ध ब्रँड जेकब अँड कंपनीचे आहे. त्याचे नाव एपिक्स एक्स राम जन्मभूमी टायटॅनियम एडिशन २ असे ठेवण्यात आले आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, या घड्याळाची किंमत सुमारे ३४ लाख रुपये आहे. या घड्याळाच्या डायलवर अयोध्या मंदिराची बारीक कोरलेली प्रतिमा आहे, तर त्यावर हिंदू देवी-देवतांचे पवित्र मंत्र देखील आहेत.