Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prajakta Mali At Mahakumbh: प्राजक्ता माळीचं महाकुंभमेळ्यात शाही स्नान, खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने सांगितला अनुभव, म्हणाली…

सर्वसामान्यांपासून विविध सेलिब्रिटीसुद्धा महाकुंभमध्ये पवित्र स्नान करत आहेत. अशातच मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीसुद्धा कुंभमेळ्याला पोहोचली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 09, 2025 | 02:34 PM
प्राजक्ता माळीचं महाकुंभमेळ्यात शाही स्नान, खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने सांगितला अनुभव, म्हणाली...

प्राजक्ता माळीचं महाकुंभमेळ्यात शाही स्नान, खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने सांगितला अनुभव, म्हणाली...

Follow Us
Close
Follow Us:

१२ वर्षांतून एकदा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा होतो. तर १४४ वर्षांतून एकदा महाकुंभ होतो. १३ जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर जगभरातील लाखो भाविक स्नान करीत आहेत. महाकुंभमध्ये यात्रेकरुंची संख्या दिवसागणिक वाढत असून दररोज लाखो भाविक संगममध्ये पवित्र स्नान करण्यासाठी आणि अध्यात्मिक पुण्य प्राप्तीसाठी येत आहेत. कुंभमेळा हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक सोहळा मानला जातो. कुंभमेळ्यात संगमावर स्नान केल्यास मृत्यूनंतर मोक्ष मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. सर्वसामान्यांपासून विविध सेलिब्रिटीसुद्धा महाकुंभमध्ये पवित्र स्नान करत आहेत. अशातच मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीसुद्धा कुंभमेळ्याला पोहोचली आहे.

चित्रपट न करता अमृता सिंह कमावते कोट्यवधी, सैफ अली खानची एक्स पत्नी कशी जगतेय लक्झरी लाईफ?

व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने तिला आलेला विलक्षण अनुभव पोस्टच्या माध्यमातून शेअर केला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणते, “तीर्थराज- प्रयागराज #महाकुंभ #२०२५ लहानपणापासूनच कुंभ मेळ्याविषयी मनात कुतूहल होतं. १४४ वर्षांनी होणारा हा मेळा याची देही याची डोळा पहावा, अनुभवावा असं मनात आलं आणि पोचले. (काल सुखरूप महाराष्ट्रातही पोचले.) आयुष्यात एकदाच येणारा अनुभव…” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चाहत्यांना प्रयागराजची झलक दाखवली असून तिथली व्यवस्था, विविध आखाडे, साधूसंतांची भेट, देवदेवतांची पूजा आणि त्यानंतर संगममध्ये पवित्र स्नानही दाखवले आहे.

कंपोजर प्रीतमला बसला धक्का; स्टाफने ऑफिसमधून पळवले ४० लाख रुपये, FIR केली दाखल

अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओचं चाहत्यांनी कौतुक केले आहे. शुटिंगच्या बिझी शेड्युल्डमधून अभिनेत्रीने वेळ काढत महाकुंभमेळ्याला हजेरी लावलेली आहे. प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचं तर, ऑक्टोबर २०२४ मध्ये रिलीज झालेल्या ‘फुलवंती’ चित्रपटातून तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यासोबतच अभिनेत्रीने या चित्रपटामध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणूनही काम केलं आहे. या चित्रपटामुळे तिच्या लोकप्रियतेतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तिच्या ह्या चित्रपटातील तिने साकारलेल्या भूमिकेचं आणि नृत्याचंही खूप कौतुक झालं. प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचं सूत्रसंचालन करत आहे. शिवाय ती प्रसाद खांडेकर दिग्दर्शित आगामी ‘चिकी चिकी बुबुम बुम’ या मराठी चित्रपटातही झळकणार आहे. २८ फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Web Title: Marathi actress prajakta mali mahakumbh shahi snan holy bath sangam prayagraj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • Mahakumbh 2025
  • Mahakumbh Mela 2025
  • marathi actress
  • prajakta mali

संबंधित बातम्या

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र
1

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र

केतकी कुलकर्णीने सांगितले २०२५ चे अनुभव, नव्या वर्षासाठी घेतली प्रेरणा; म्हणाली, ”आयुष्याचे मोठे धडे..”
2

केतकी कुलकर्णीने सांगितले २०२५ चे अनुभव, नव्या वर्षासाठी घेतली प्रेरणा; म्हणाली, ”आयुष्याचे मोठे धडे..”

…आणि मी हो म्हटलं! ‘या’ मराठी अभिनेत्रीला खास अंदाजात बॉयफ्रेंडने केलं प्रपोज, अंगठी दाखवत दिली प्रेमाची जाहीर कबुली
3

…आणि मी हो म्हटलं! ‘या’ मराठी अभिनेत्रीला खास अंदाजात बॉयफ्रेंडने केलं प्रपोज, अंगठी दाखवत दिली प्रेमाची जाहीर कबुली

मुंबईत टाळ्या शिट्ट्यानी दणाणला “संभवामि युगे युगे ” चा पहिला शो; परदेशातही सुरु आहे चर्चा!
4

मुंबईत टाळ्या शिट्ट्यानी दणाणला “संभवामि युगे युगे ” चा पहिला शो; परदेशातही सुरु आहे चर्चा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.