कलर्स मराठीवरील अशोक मा.मा. मालिकेत भैरवीने अनिशसोबत लग्न केले असून आता ती मामांच्या घरात राहायला आली आहे. तसं असून देखील अखेर निर्णय मामाच घेणार तितकंच खरं आहे. भैरवीच्या येण्यामुळे तिच्यातील आणि अशोक मामा यांच्यातील तणाव आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. मामांनी भैरवीला आठ दिवसांचं चॅलेंज दिलंय ज्यानुसार मुलांना त्यांच्याच नजरेसमोर सांभाळण्याचं आहे. भैरवीने हे आव्हान स्वीकारलं असलं तरी तिच्यासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
कलर्स मराठीवर प्रेक्षकांसाठी महिला दिन विशेष भागांची मेजवानी, जाणून घ्या
आता या अडचणी काय असतील ? कशी ती मामांनी दिलेलं चॅलेंज पूर्ण करणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेव्हा बघत राहा अशोक मा.मा. सोम ते शनि रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. यासगळ्याची सुरुवात अगदी छोट्या गोष्टीपासून झाली. मामांनी भांडी घासायचं ठरवलं आणि भैरवीला दूध घेऊन येण्यास सांगितलं. मात्र भैरवीचं लक्ष नसल्याने ते स्वतःच दूध घ्यायला गेले. याचदरम्यान, घरातील कामं आणि मुलांच्या जबाबदाऱ्या वाटण्यातून वाद विकोपाला गेला. भैरवीची तब्येत बिघडल्याचं पाहून प्रभूने ती गोष्ट मामांना सांगितली, पण मामांनी तिला उगाच अफवा पसरवू नकोस असं सुनावलं. मामांनी मुलांना कामं वाटल्यामुळे भैरवीचा पारा चढला. तिने हे मुद्दाम केलं जातंय असं अनिशला सांगितलं.
दुसरीकडे, यासगळ्याला कंटाळून अनिशने सगळी कामं स्वतःच करण्याचा निर्णय घेतला. या सगळ्यात घरातील मुलं मात्र भैरवीच्या स्वयंपाकावर नाराज आहेत, आणि नवीन हिंदी भाषिक मोलकरणीच्या येण्यामुळे आणखी गोंधळ उडालाय. तणावाच्या या वातावरणात पंखुडीचे गाणं, संयमीची पार्टी, आणि प्रियाच्या हेअरस्टाईलवरून झालेला वाद सगळं काही अधिकच गुंतागुंतीचं होतंय. आता प्रश्न असा आहे की भैरवी मामांचं चॅलेंज पूर्ण करू शकेल का? की या आठ दिवसांत आणखी काही धक्कादायक घडामोडी होतील? पुढील भागात काय होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे! पुढे मालिकेत काय घडणार हे जाणून घेण्यासाठी बघत राहा अशोक मा.मा. सोम ते शनि रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.