Nana Patekar- Tanushree Dutta MeToo News
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना ‘मी टू’प्रकरणी अखेर दिलासा मिळाला आहे. तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात दाखल केलेली जनहित याचिका मुंबई न्यायालयाने फेटाळून लावली आहे. लैंगिक छळाचा आरोप झाल्याप्रकरणी नाना पाटेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाना पाटेकर यांच्याविरोधातील B समरी रिपोर्ट दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
दरम्यान, अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. मात्र हे आरोप सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध नसल्याने दंडाधिकारी कार्यालयाने B समरी रिपोर्ट फेटाळून लावला आहे. त्यामुळे नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी दिलेल्या तपास अहवालाची दखल घेत न्यायालयाने तक्रार कोणत्या आधारावर करण्यात आली आणि या संदर्भात पोलिसांनी न्यायालयात सादर केलेला अहवाल काय आहे हे शोधून काढले. त्या आधारावर कोणावरही गुन्हा दाखल करता येणार नाही. त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या तपास अहवालाची दखल घेत न्यायालयाने सध्या तरी ही तक्रार फेटाळून लावली आहे.
मे महिन्यात तापमान वाढवायला ‘पी.एस.आय.अर्जुन’ येतोय, अंकुश चौधरी दिसणार लक्षवेधी भूमिकेत…
‘मी टू’ प्रकरणात नाना पाटेकर यांना न्यायालयाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, तक्रार दाखल करण्यात आलेल्या ओशिवरा पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात न्यायालयाने खटल्याचे स्वरूप विचारात घेतलेले नाही. न्यायालयाने फक्त पोलिसांनी तक्रार दाखल करण्याच्या मर्यादांचा विचार केला आहे. तनुश्री दत्ताने दाखल केलेली तक्रार खोटी होती की खरी हे न्यायालयाने सांगितलेले नाही. तथापि, अंतिम पोलिस अहवालाच्या आधारे, हे नाकारण्यात आले आहे.
याचिका दहा वर्षांहूनही अधिक जास्त काळानंतर या प्रकरणावर याचिका दाखल करण्यास उशिर का झाला असा सवालही कोर्टाने विचारला आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर आणि इतरांविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात विनयभंग तसेच धमकीची तक्रार दाखल केली होती. यावर दंडाधिकाऱ्यासमोर सुनावणी झाली. मुंबई पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट तसेच पुरेशा पुराव्यांअभावी तनुश्रीने दाखल केलेली तक्रार न्यायालयाने अखेर नाकारल्याचं वृत्त आहे.
2008 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान नाना पाटेकर यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला होता. या तक्रारीवरून ओशिवरा पोलीस ठाण्यात पाटेकर, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण बराच काळ चर्चेत होतं. चित्रपटाची शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा तनुश्रीने केला होता. इतकंच नव्हे तर सिंगर एक्टर शूट होणार होतं, तरी देखील नाना पाटेकर सेटवर आले होते, असे देखील तनुश्री दत्ताने म्हटलं होतं.
नाना पाटेकर यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मात्र सबळ पुरावे आणि साक्षीदार नसल्याने पोलिसांनी वर्षभरातच केस बंद केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, तनुश्रीने नानांविरोधात दंडाधिकारी न्यायालयामध्ये B समरी रिपोर्ट दाखल केला होता. ओशिवारा पोलिस ठाण्याद्वारे ‘B’ समरी रिपोर्ट (तक्रारदाराला आरोप करण्यासाठी) मंजुरीसाठी दाखल केलेला मिसलेनियस अर्ज क्र. 427/2019 न्यायाधीशांनी नाकारला आहे. कोर्टाने दिलेल्या माहितीनुसार, तपास अधिकाऱ्यांनी दाखल केलेला ‘B’ समरी रिपोर्ट स्वीकारता येत नाही. त्यावर कारवाई करण्यास अडथळा येत आहे. अद्याप न्यायालयाने तनुश्री दत्ताची तक्रार खरी आहे की खोटी, हे अद्याप ठरवलेलं नाही. आता न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेला ‘B समरी रिपोर्ट’ नाकारल्यानंतर, पोलिसांसमोर दोन पर्याय उरले आहेत. ते म्हणजे, आरोपपत्र दाखल करणे किंवा सेशन न्यायालयात पुनरावलोकनासाठी आदेशाला आव्हान करणे. अशी माहिती तनुश्री दत्ता हिचे वकील नितीन सातपुते यांनी दिली आहे.
न्यायालयाचे मुख्य निरीक्षण असे आहे की, गुन्ह्याच्या प्रकरणाची मुदत कालावधी संपली आहे. आता पोलिसांनी न्यायालयाला संतुष्ट करणे आवश्यक आहे. कारण त्यांचा ‘B समरी रिपोर्ट’नाकारला आहे, पण तनुश्री दत्ताची तक्रार नाकारलेली नाही. न्यायालयाने ओशिवारा पोलिस ठाण्याचा मिसलेनियस अर्ज नाकारला असून काही न्यूज पोर्टल्स चुकीची माहिती पसरवत आहेत की तनुश्री दत्ताचा तक्रार अर्ज नाकारला आहे. या सर्व सुनावणीमध्ये आरोपींचे प्रतिनिधित्व कोणीही केलेले नाही. असं नितीन सातपुते यांनी म्हटलं आहे.