Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणूकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ आता OTTवर उपलब्ध, थिएटरमध्ये चुकलेला अनुभव आता घरबसल्या

अरविंद जगताप लिखित आणि दिनेश जगताप दिग्दर्शित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट आता ‘प्रसारभारती’च्या वेव्हज ओटीटी चॅनलवर उपलब्ध झाला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 22, 2025 | 03:55 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. प्रेक्षक आता थिएटरसोबतच ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची आतुरतेने वाट पाहत असतात. अशाच पार्श्वभूमीवर, अरविंद जगताप लिखित आणि दिनेश जगताप दिग्दर्शित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट आता ‘प्रसारभारती’च्या वेव्हज ओटीटी चॅनलवर उपलब्ध झाला आहे. जो थिएटरमध्ये पाहण्याची संधी चुकली असेल, त्यांच्यासाठी हा चित्रपट घरबसल्या पाहता येईल. हलकीफुलकी आणि रंजक गोष्ट सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आणीबाणीच्या काळाचा अनुभव मनोरंजक पद्धतीने देतो.

हा चित्रपट १८ डिसेंबर२०२५ रोजी ‘प्रसारभारती’ च्या वेव्हज ओ.टी.टी. चॅनलवर जगभरात प्रदर्शित झाला आहे. उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, प्रविण तरडे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, सुनिल अभ्यंकर आदी कलाकारांच्या चित्रपटातील भूमिका लक्षवेधी आहेत.

आणीबाणीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेली ही हलकी-फुलकी गोष्ट आहे. या चित्रपटातील नायकाच्या अभिमन्यूच्या अफलातून संघर्षाची. एखाद्या सरकारी आदेशाची अंमलबजावणी करताना होणाऱ्या गोंधळाची. नवरा बायकोच्या प्रेमाची आणि सोबत बाप लेकाच्या नात्याची. राजकीय परिस्थितीवर आपल्या मिश्किल लिखाणाने प्रहार करत लेखक अरविद जगताप यांनी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर ही रंजक कथा लिहिली आहे. ‘आणीबाणी’ कोणासाठी अडचण ठरणार? आणि अडचणीत सापडलेले या ‘आणीबाणी’ तून कसे बाहेर पडणार? याची मनोरंजक कथा चित्रपटात मांडण्यात आली आहे.

”लक्ष्मी निवास’ मालिकेने बदललं आयुष्य..’ मेघन जाधवची वर्षअखेरची भावुक पोस्ट, अभिनेत्याने शेअर केल्या आठवणी

कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी’ चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे. देवदत्त मनीषा बाजी, आदित्य पटाईत, पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे. पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक तर कलादिग्दर्शन सुधीर सुतार यांचे आहे. साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे. डी.आय, किरण कोट्टा आणि मिक्सिंग नागेश राव चौधरी यांनी केले आहे. छायांकन मंगेश गाडेकर यांनी केले असून संकलन प्रमोद कहार यांनी केले आहे. नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर आहेत.

PM Narendra Modi Biopic: ‘हा’ दक्षिण भारतीय स्टार मोठ्या पडद्यावर साकारणार मोदींची भूमिका, माँ वंदे’अभिनेत्याचे गुजरातशी जुने नाते

Web Title: Aanibani now available on ott missed the theater watch it from home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 03:55 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • OTT platform

संबंधित बातम्या

‘आशा’ला आशाताईंची पसंती ! आशा सेविकांच्या सन्मानासाठी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद, ठेवले मोफत शो
1

‘आशा’ला आशाताईंची पसंती ! आशा सेविकांच्या सन्मानासाठी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद, ठेवले मोफत शो

संतापाच्या भरात नवऱ्याने बायकोच्या कपाळावर लिहिले ‘निर्लज्ज’, ‘या’ मालिकेवर प्रेक्षकांनी केला संताप व्यक्त, गाठला कळस
2

संतापाच्या भरात नवऱ्याने बायकोच्या कपाळावर लिहिले ‘निर्लज्ज’, ‘या’ मालिकेवर प्रेक्षकांनी केला संताप व्यक्त, गाठला कळस

दारू, नशा आणि धोकेबाजी… गँग्स ऑफ वासेपूर  फेम ‘या’ अभिनेत्याने आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत केलेल्या खुलाशांमुळे खळबळ
3

दारू, नशा आणि धोकेबाजी… गँग्स ऑफ वासेपूर फेम ‘या’ अभिनेत्याने आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत केलेल्या खुलाशांमुळे खळबळ

‘तू मेरी मैं तेरा’चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, रिलीजपूर्वच कार्तिक-अनन्या यांच्या चित्रपटाविरुद्ध कोर्टात तक्रार दाखल
4

‘तू मेरी मैं तेरा’चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, रिलीजपूर्वच कार्तिक-अनन्या यांच्या चित्रपटाविरुद्ध कोर्टात तक्रार दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.