Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मुंबई लोकल”मध्ये फुललेली प्रेमकथा लवकरच रूपेरी पडद्यावर दिसणार, रिलीज डेट आली समोर

मराठी चित्रपट सध्या जास्त चर्चेत आहेत तसेच आणखी एका नव्या चित्रपटाची यामध्ये भर पडली आहे. "मुंबई लोकल" हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 27, 2025 | 04:27 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता ‘मुंबई लोकल’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून, १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट नक्कीच एक अनोखी कथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.

आलिया भट्टने केले रेखाचे कौतुक, १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा तयार केला लूक; काय म्हणाली अभिनेत्री?

बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत “मुंबई लोकल” या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित यांनी केलं आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश राठी आणि आनंदी एंटरटेनमेंटच्या प्राची अग्रवाल, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी यांनी ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर त्र्यंबक डागा हे सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यासह मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे अशा उत्तम कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

“मुंबई लोकल” या चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन स्वप्निल जाधव यांनी केले आहे. तर विनोद शिंदे हे या चित्रपटाचे असोसिएट डिरेक्टर आणि कलादिग्दर्शक डॉ.सुमित पाटील आहेत. चित्रपटातील गाणी गीतकार अभिजीत कुलकर्णी आणि अभिजीत यांची असून देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी आणि हर्षवर्धन वावरे यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केले आहे तर पार्श्वसंगीत समीर सप्तिसकर यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक म्हणून राहुल ठोंबरे यांनी काम पाहिले आहे.

कपाळी चंद्रकोर, नाकात नथ अन् रक्तबंबाळ चेहरा…; रश्मिका मंदान्नाचा ‘मैसा’ चित्रपटातील लक्षवेधी लूक व्हायरल

लोकल रेल्वेचं मुंबईमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबई लोकल हे अनेकांचं जणू कुटुंब आहे. लोकल प्रवासात संवाद होतात, वाद होतात, मैत्री होते, तसंच प्रेमही फुलतं. लोकल प्रवासात फुललेली अशीच एक अनोखी प्रेमकहाणी ‘मुंबई लोकल’ या चित्रपटात पाहता येणार आहे. लोकल रेल्वे काही मराठी चित्रपटांतून दाखवली गेली असली, तरी लोकलमध्ये फुलणारी प्रेमकथा पहिल्यांदाच मराठी चित्रपटात दिसणार आहे. ‘टाइमपास’, ‘टकाटक’, ‘बालक पालक’ असे अनेक यशस्वी चित्रपट केलेला प्रथमेश परब, तर ‘सख्या रे’, ‘जिंदगी नॉट आऊट’, ‘शतदा प्रेम करावे’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ अशा मालिकामध्ये चमकलेली ज्ञानदा रामतीर्थकर प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. “मुंबई लोकल”चा एक अनुभव मोठ्या पडद्यावर १ ऑगस्टपासून प्रेक्षकांना घेता येणार आहे.

Web Title: Actor prathamesh parab and marathi actress dnyanada ramtirthka marathi movie news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 04:27 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’
1

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ
2

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ

काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री
3

काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा
4

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.