Rashmika Mandanna looks unrecognizable in Mysaa
टॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. ‘नॅशनल क्रश’ म्हणून चाहत्यांमध्ये फेमस असलेल्या रश्मिका सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच रश्मिकाच्या अपकमिंग चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘पुष्पा २’, ‘छावा’ आणि ‘कुबेरा’नंतर आता अभिनेत्री ‘मैसा’ नावाच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा चित्रपटातला पहिला वहिला लूक व्हायरल झाला आहे. काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर हा लूक शेअर केलेला आहे.
डेटिंगच्या अफवांदरम्यान एकत्र दिसले फातिमा शेख आणि विजय वर्मा, सोबत दिली पोझ; Photo Viral
रश्मिकाने नुकतंच तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या नव्या चित्रपटातून ती एका नव्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने तिच्या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. रश्मिकाचा ‘मैसा’ चित्रपटात थरारक लूक पाहायला मिळत आहे. तिच्या थरारक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधलेय. लाल रंगाची सिंपल साडी, डार्क ब्लू ब्लाऊज, कपाळी चंद्रकोर, नाकात नथ आणि रक्ताने माखलेला चेहरा त्यासोबतच हातात शस्त्र असा लूक करत अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष वेधलेय.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये रश्मिकाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “मी नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन, वेगळं आणि काहीतरी हटके देण्याचा प्रयत्न करते. खरंतर, माझ्या कामामधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढावी यासाठीही मी प्रयत्नशील असते आणि हा चित्रपटसुद्धा तसाच काहीसा आहे. यापूर्वी मी कधीही असं पात्र साकारलं नव्हतं किंवा कधीही असं जग पाहिलं नव्हतं. मी कधीच स्वतःचं असं रूपही पाहिलं नव्हतं. ही भूमिका खूपच वेगळी आहे, त्यामुळे मला सध्या दडपण आलं आहे, पण मी यासाठी तितकीच उत्सुकही आहे; त्यामुळे ही कलाकृती तुम्ही पाहावी आणि तुम्हाला ती आवडेल यासाठी मी खूप उत्सुक आहे. ही तर फक्त सुरुवात आहे.” अशा शब्दात रश्मिकाने तिच्या अपकमिंग प्रोजेक्टबद्दल उत्सुकता दर्शवली आहे.
रश्मिका मंदान्ना स्टारर ‘मैसा’ हा आगामी चित्रपट हिंदीसह इतर चार दाक्षिणात्य भाषेत प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. रवींद्र पुल दिग्दर्शित ‘मैसा’ चित्रपटाची निर्मिती ‘अनफॉर्म्युला फिल्म्स’ या निर्मिती संस्थेने केली आहे. रश्मिकासह या चित्रपटात कोणता अभिनेता तसेच कोणकोणते इतर कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवाय, चित्रपटाची रिलीज डेटही अद्याप गुलदस्त्यातच आहे.