
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘अप्पी आमची कलेक्टर’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी नाईक, जी सर्वांची आवडती अप्पी आहे, लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. शिवानी आणि अमित लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.शिवानी आणि अमित यांचा एकमेकांना अंगठी घालत साखरपुडा समारंभ संपन्न झाला आहे.
‘इट्स मज्जा मराठी’ ने शिवानी नाईक आणि अमित रेखीच्या साखरपुड्याचा एक्सक्लुझिव्ह लूक त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोंमध्ये शिवानी आणि अमित पारंपरिक पोशाखात अत्यंत सुंदर दिसत आहेत. शिवानीने लाल रंगाची साडी नेसली असून तिच्या साडीवरील गोल्डन काठ तिच्या लूकमध्ये खास भर घालतोय. शिवानीच्या ब्लाऊजवर असलेले स्त्रीचे चित्र आणि मोगऱ्याच्या वेलीचा शेला देखील तिच्या लूकला अधिक उठावदार बनवत आहेत.
“अलविदा डॅड…”: सतीश शाहांच्या निधनाने सुमीत राघवन भावूक, शेअर केल्या आठवणी
अमितने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला आहे. शिवानी आणि अमित हातात हात घालून एकमेकांसोबत व्हिडीओ शूट करताना दिसत आहेत. आता साऱ्यांच्या नजरा फक्त या जोडप्याच्या लग्नाच्या मोठ्या दिवशी लागल्या आहेत, की त्यांनी लग्नबंधनात कधी अडकणार हे पाहण्यासाठी.
अमित आणि शिवानी यांचा साखरपुडा समारंभ २६ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडणार असून त्यांच्या साखरपुड्याच्या विधींना सुरुवात झाली आहे. या खास कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद दिला. निवेदिता सराफ यांच्या एंट्रीला अमित आणि शिवानी यांनी त्यांचे स्वागत करुन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी निवेदिता यांनी दोघांनाही जवळ घेत मिठी मारली.