(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
टेलिव्हिजन विश्वात नेहमीच चर्चेत असलेला चॅनल स्टार प्लस प्रेक्षकांच्या भेटीला वैविध्यपूर्ण विषयावर आधारित मालिका घेऊन येत असतो. यावेळीही स्टार प्लस आपल्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस परशुराम’ मालिकेसह प्राइम टाइम फिक्शनचा पट अधिक भक्कम करण्यास सज्ज झाला आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधून मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मालिकेत दैनंदिन कौटुंबिक आयुष्य आणि एका धोकादायक गुप्त जगाची गोष्ट अतिशय प्रभावीपणे मांडलेली दिसते.या मालिकेत दैनंदिन कौटुंबिक आयुष्य आणि एका धोकादायक गुप्त जगाची गोष्ट अतिशय प्रभावीपणे मांडलेली दिसते. मालिकेत अभिनेता नील भट्ट आव्हानात्मक अशा दुहेरी भूमिकेत झळकणार असून तो शिवप्रसाद, एक समर्पित पती आणि परशुराम, एक गुप्तहेर अशा भूमिका साकारणार आहे.
शिवप्रसाद हा एक सर्वसामान्य माणूस असून तो विवाहित आहे आणि त्याला दोन मुले आहेत त्याचा पत्नीचे नाव शालिनी आहे तर दुसरीकडे परशुराम हा एक गुप्तहेर आहे आणि शालिनीला आपल्या पतीचे हे दुहेरी आयुष्य माहीत नाही. या अनोख्या भूमिकेबद्दल आणि त्या साकारण्याच्या अनुभवाबद्दल नीलने आपली उत्सुकता व्यक्त केली. आपल्या भूमिकेबद्दल आणि एकूण अनुभवाबद्दल बोलताना नील भट्ट म्हणाला, “या मालिकेबद्दल मला सर्वात जास्त आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे दुहेरी भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणं. शिवप्रसाद मध्ये दडलेला परशुराम साकारणं ही ही सुंदर द्वैतता आहे. प्रोमो शूट करताना आम्ही या पात्राकडे असा दृष्टिकोन ठेवला की घरात तो रामासारखा शांत, संयमी आणि समर्पित तर घराबाहेर परशुरामासारखा शक्तिशाली, निर्भय आणि निर्णायक आहे आणि हाच विचार माझ्या अभिनयाचा पाया ठरला आहे”
Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी’त खेळाला नवं वळण! प्यादे कोण, वजीर कोण? प्रोमोंमधून उलगडतोय डाव
शिवप्रसादबद्दल बोलताना नील म्हणाला,
“शिवप्रसाद हा पूर्णपणे कुटुंबवत्सल माणूस आहे. त्याचे कुटुंबच त्याचे चारधाम आहे आणि तो फक्त आपल्या पत्नी आणि मुलांसमोरच नतमस्तक होतो. काहीही झाले तरी त्याच्या प्रेमात किंवा निष्ठेत कधीच शंका नसते आणि ही भावनिक बाजू साकारणे मला या पात्राच्या प्रेमात पडणारी ठरली”
परशुरामबद्दल बोलताना तो म्हणतो
“परशुराम हा एक निर्भय गुप्तहेर आहे असून अॅक्शन आणि मार्शल आर्ट्सचा माझा अनुभव असल्याने मी सर्व स्टंट्स स्वतः केले ज्यामुळे हा अनुभव आणखी समाधानकारक ठरला”
तो पुढे म्हणाला “मी या दोन्ही भूमिकांना आव्हानात्मक म्हणणार नाही तर मोहक म्हणेन एकाच भूमिकेत दोन पूर्णपणे विरुद्ध स्वभाव असलेल्या भूमिका साकारणे या प्रवासाला अत्यंत रोमांचककारक बनवते. या मालिकेतील भूमिकेतील प्रत्येक क्षण मनापासून अनुभवतो आहे”






