Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अस्मिता गादेकरची संगीत यात्रा सुरु; “मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद”मध्ये चमकणार

मी होणार सुपरस्टारचा मंच ही केवळ स्पर्धा नसून स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देणारा हक्काचा मंच आहे. या पर्वातली स्पर्धक अस्मिता गादेकरने नुकताच याचा प्रत्यय घेतला.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 19, 2026 | 03:44 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या चौथ्या पर्वालाही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले छोटे उस्ताद आपल्या टॅलेण्टने संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करत आहेत. मी होणार सुपरस्टारचा मंच ही केवळ स्पर्धा नसून स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देणारा हक्काचा मंच आहे. या पर्वातली स्पर्धक अस्मिता गादेकरने नुकताच याचा प्रत्यय घेतला. नाशिकच्या अस्मिताने काही दिवसांपूर्वीच वडिलांचं छत्र गमावलं. अस्मिता आणि तिच्या दोन बहिणींची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची आई दिवसरात्र कष्ट करते. आपल्या मुलीने नाव कमवावं हे स्वप्न उराशी बाळगून अस्मिताच्या आईने तिला मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या मंचावर आपलं टॅलेण्ट दाखवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. याआधीच्या पर्वातही अस्मिताने सहभागी होण्यासाठी खूप प्रयत्न केले.

मात्र चौथ्या पर्वात तिला खऱ्या अर्थाने तिला सूर गवसला आणि तिची निवड झाली. अस्मिताने अल्पावधीतच आपल्या गाण्याने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. नुकतंच आदर्श शिंदेने गायलेलं एक भीमगीत अस्मिताने सादर केलं. तिने सादर केलेल्या परफॉर्मन्सला तिन्ही परिक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली. अस्मिताची गाण्यातली चमक पाहून स्टार प्रवाह वाहिनी आणि मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या टीमने तिचा शालेय खर्च आणि सांगितीक वाटचालीसाठी लागणारी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे

Bigg Boss Marathi 6: घरातील वाद टोकाला, अनुश्रीच्या वागण्यामुळे राकेश बापटचा संयम सुटला; घर सोडण्याचा दिला इशारा

सुप्रसिद्ध गायक आणि छोटे उस्तादचा जज आदर्श शिंदे याप्रसंगी म्हणाला, ‘अस्मिताने गायलेलं गाणं मी तिच्या वयाचा असताना रेकॉर्ड केलं होतं. पण ती माझ्यापेक्षा सुंदर गायली. मला अस्मिताचा अभिमान आणि गर्व आहे की इतक्या समजूतदारपणे तिने हे गाणं गायलं. माझ्या यापुढच्या कार्यक्रमांमध्ये अस्मिताने गाणं सादर करावं अशी माझी इच्छा आहे. छोटी उस्तादची मुलं मला प्रेमाने आदर्श दादा म्हणतात. दादा या नात्यानेच मी सांगू इच्छितो की अस्मिताच्या नववीतल्या अभ्यासाचा खर्च स्टार प्रवाह वाहिनी आणि छोटे उस्तादची टीम करणार आहे. इतकंच नाही तर अस्मिताला तिच्या सांगितीक वाटचालीत कुठलंही वाद्य लागलं तर तिने ते हक्काने माझ्याकडे मागावं.’मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ही नुसती स्पर्धा नसून एक कुटुंब आहे. या कुटुंबाचा सदस्य असल्याचा अभिमान प्रत्येकाला आहे.

ए.आर. रहमानला पाठिंबा देणे परेश रावल यांना पडले महागात; ‘राष्ट्राचा अभिमान’ म्हणाल्यानंतर जनतेने केली टीका

Web Title: Asmita gadekar musical journey begins set to shine in mi honar superstar chhote ustaad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi show
  • star pravah

संबंधित बातम्या

जखमेवर मात करत अमृता खानविलकरचा अ‍ॅक्शन अवतार, ‘तस्करी’मधील भूमिका चर्चेचा विषय
1

जखमेवर मात करत अमृता खानविलकरचा अ‍ॅक्शन अवतार, ‘तस्करी’मधील भूमिका चर्चेचा विषय

‘मला माहीत नाही मी परत येईन की नाही…’ सोशल मीडियावर नेहा कक्करची धक्कादायक पोस्ट, नक्की काय घडलंय?
2

‘मला माहीत नाही मी परत येईन की नाही…’ सोशल मीडियावर नेहा कक्करची धक्कादायक पोस्ट, नक्की काय घडलंय?

Bigg Boss Marathi 6: घरातील वाद टोकाला, अनुश्रीच्या वागण्यामुळे राकेश बापटचा संयम सुटला; घर सोडण्याचा दिला इशारा
3

Bigg Boss Marathi 6: घरातील वाद टोकाला, अनुश्रीच्या वागण्यामुळे राकेश बापटचा संयम सुटला; घर सोडण्याचा दिला इशारा

काही वर्षांपूर्वी शिकलो असतो तर उत्तम… ‘ही’ गोष्ट खातेय मन! बिग बींना कोणत्या गोष्टीचा आहे पश्चाताप?
4

काही वर्षांपूर्वी शिकलो असतो तर उत्तम… ‘ही’ गोष्ट खातेय मन! बिग बींना कोणत्या गोष्टीचा आहे पश्चाताप?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.