Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कुरळे ब्रदर्स’ नव्या वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीस! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची रिलीज डेट जाहीर

सध्या मराठी चित्रपटांची चर्चा होताना दिसत आहे. आणि आता अशातच आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे, ज्याचे नाव आहे ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’. या चित्रपटाची रिलीज डेट अखेर जाहीर झाली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 25, 2025 | 02:41 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘कुरळे ब्रदर्स’ नव्या वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीस
  • ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची रिलीज डेट जाहीर
  • ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ पाहण्यासाठी चाहते उत्सुक
 

नाताळ म्हणजे आनंद, भेटवस्तू आणि हसू… आणि याच नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ‘कुरळे ब्रदर्स’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर झळकणार असून, हा चित्रपट येत्या ३० जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पोस्टर पाहाताच एक गोष्ट स्पष्ट होत आहे की, या वेळी गोंधळ डबल आहे… आणि धमालही डबल होणार आहे. साध्या परिस्थितीतून मोठा गोंधळ निर्माण करणारी ‘साडे माडे तीन’ची ओळख या नव्या पोस्टरमधूनही ठळकपणे जाणवते आणि त्यामुळेच प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या चित्रपटामध्ये घडणारी धमाल आणि गोंधळ पुन्हा अनुभवण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘Welcome To The Jungle’ची रिलीज डेट जाहीर; अक्षयने ख्रिसमसनिमित्त त्याच्या ‘जंगली फौज’चा शेअर केला Video

‘साडे माडे तीन’चा पहिला भाग आजही प्रेक्षकांच्या आठवणीत ताजा आहे. भावंडांमधील जिव्हाळा, निरागस विनोद आणि पोट धरून हसवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या हृदयात कायमचा घर करून बसला आहे. विशेष म्हणजे, या अविस्मरणीय पहिल्या भागाचं दिग्दर्शनही अंकुश चौधरी यांनीच केले आहे. अभिनेता म्हणून लोकप्रिय असलेला अंकुश चौधरी दिग्दर्शक म्हणूनही तितकेच सक्षम आणि संवेदनशील असल्याचं त्यांनी अनेक चित्रपटांतून सिद्ध केले आहे. मनोरंजन आणि कथन यांचा अचूक समतोल साधणारी त्यांची दिग्दर्शकीय शैली ‘साडे माडे तीन’च्या यशामागचं मोठं कारण ठरली आहे.

आता तब्बल एकोणीस वर्षांनंतर, त्याच आठवणींना उजाळा देत आणि आजच्या काळाशी जुळवून घेत ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अंकुश चौधरी यांच्यासारख्या अनुभवी दिग्दर्शकाच्या हातात ही कथा पुन्हा एकदा साकारली जात असल्यामुळे, या वेळी हास्याबरोबरच कथेतली पकडही तितकीच भक्कम असणार, यांचा अंदाज येत आहे.

या चित्रपटाचे निर्मात्या उषा काकडे या चित्रपटाबद्दल म्हणले की, “हा चित्रपट म्हणजे केवळ पुढचा भाग नाही, तर प्रेक्षकांच्या आठवणींवरची प्रेमाची फुंकर आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जपून आणि मनापासून केली आहे.” तर, निर्माते अमेय खोपकर म्हणाले, ‘’पहिला चित्रपट पाहून मोठा झालेला प्रेक्षक आणि आजचा तरुण प्रेक्षक दोघांनाही एकत्र हसवणं, हीच आमची खरी परीक्षा होती आणि मला खात्री आहे, यात आम्ही यशस्वी झालो आहोत.’’

Avatar 3 Worldwide Collection: ख्रिसमस आधीच ६ दिवसांत ४००० कोटींचा टप्पा पार, भारतात १०० कोटींची कमाई

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते आहेत. मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते असून स्मिथ पीटर तेलगोटे सहायक निर्माता आहेत.

अंकुश चौधरी यांची कथा, संदीप दंडवते यांची पटकथा आणि संवाद लाभलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर आणि समृद्धी केळकर यांच्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले आहे. तसेच हा चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या खूप जवळचा आहे, त्यामुळे तो पाहण्यासाठी त्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Web Title: Avatar fire and ash collection worldwide crosses 4000 crore in six days ahead of christmas holiday 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 02:41 PM

Topics:  

  • ashok saraf
  • entertainment
  • marathi cinema

संबंधित बातम्या

Avatar 3 Worldwide Collection: ख्रिसमस आधीच ६ दिवसांत ४००० कोटींचा टप्पा पार, भारतात १०० कोटींची कमाई
1

Avatar 3 Worldwide Collection: ख्रिसमस आधीच ६ दिवसांत ४००० कोटींचा टप्पा पार, भारतात १०० कोटींची कमाई

‘Welcome To The Jungle’ची रिलीज डेट जाहीर; अक्षयने ख्रिसमसनिमित्त त्याच्या ‘जंगली फौज’चा शेअर केला Video
2

‘Welcome To The Jungle’ची रिलीज डेट जाहीर; अक्षयने ख्रिसमसनिमित्त त्याच्या ‘जंगली फौज’चा शेअर केला Video

कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीत समाराचा दिला बदललेला लूक, आजी नीतू कपूरशी केली तुलना; पाहा Video
3

कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीत समाराचा दिला बदललेला लूक, आजी नीतू कपूरशी केली तुलना; पाहा Video

Maha municipal polls: शिवसेनेने जाहीर केलेल्या ४० ‘स्टार प्रचारकांमध्ये’ गोविंदाचा समावेश; अभिनेता लढणार निवडणूक?
4

Maha municipal polls: शिवसेनेने जाहीर केलेल्या ४० ‘स्टार प्रचारकांमध्ये’ गोविंदाचा समावेश; अभिनेता लढणार निवडणूक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.