Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाघ्या-मुरळी परंपरेवर आधारित ‘फुला’! दमदार ट्रेलरने वाढवली उत्सुकता; ‘या’ दिवशी होणार रिलीज

‘फुला’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लॉंच झाला असून, टीजरनंतर आलेल्या ट्रेलरने चित्रपटाविषयीची उत्सुकता आता अधिकच वाढवली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 04, 2026 | 02:52 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षमय कथा आगामी ‘फुला’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटातून अस्सल संगीताची मेजवानी मिळणार असून, बऱ्याच काळानंतर मराठी चित्रपटात सात गाण्यांचा भरभक्कम अल्बम ऐकायला मिळणार आहे. १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच करण्यात आला असून, टीजरनंतर आलेल्या ट्रेलरने चित्रपटाविषयीची उत्सुकता आता अधिकच वाढवली आहे.

पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी “फुला” या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा अभिषेक जावीर यांची असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे तर चित्रपटाची पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. समाधान ऐवळे यांनी संगीत दिग्दर्शन, अमर देवकर यांनी सर्जनशील दिग्दर्शन, रवीकिरण जावीर, समाधान ऐवळे यांनी गीतलेखन, प्रताप जोशी यांनी छायांकन, निर्मिती रचना अतुल लोखंडे यांनी केली राहुल प्रजापती यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे, आकाश नवगिरे यांनी चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे. प्रियांतिका, आरोही गडदे, मंजुषा खेत्री, संतोष शिंदे, देवा गाडेकर, रविकिरण जावीर, सनी कदम, छाया आदट, शरद लांडगे या नव्या दमाच्या कलाकारांचा उत्तम अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे. नृत्य दिग्दर्शन आशुतोष कीर्तिकर आणि सृष्टी जाधव यांचे आहे. वेशभूषाकार कोमल जावीर, अक्षता पाटील असून रंगभूषाकार समाधान भोरे यांनी काम पाहिले आहे.


आई-मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास, ‘तिघी’ पाचव्या आठवड्यातही प्रेक्षकांच्या मनात जिवंत; चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लहान वयातच खंडोबाशी लग्न लावलेली एक मुलगी, तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी, संस्कृतीच्या पदराखाली नाकारलं जाणारं तिचं अस्तित्व अशा कथासूत्रावर “फुला” हा चित्रपट बेतला असल्याचं ट्रेलरवरून दिसून येतं. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील तमाशा फड, जागरण गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट आकार घेते. देखण्या दृश्यप्रतिमा, नव्या असलेले कसदार कलाकार, अस्सल संगीताचा बाज या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. एकीकडे एआयसारख्या तंत्रज्ञानाचा विस्तार होत असताना अजूनही परंपरांचा किती खोल पगडा समाजावर आहे याचा विरोधाभास हा चित्रपट अधोरेखित करतो. आटपाडीतील काही तरुणांनी एकत्र येऊन केलेल्या या वेगळ्य़ा धाटणीच्या चित्रपटात सात गाणी, टीजरला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे आता अधिकच उत्सुकता निर्माण केली आहे. आटपाडी तालुक्यातील निंबवडे सारख्या ग्रामीण भागात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. संगीतमय पद्धतीनं मांडलेला संघर्ष या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. नव्या दमाच्या कलावंतांची ही अस्सल कलाकृती पाहण्यासाठी आता १७ एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

”माझ्या निधनानंतर..”, अभिनेत्री स्मिता पाटील यांनी मृत्यूपूर्वी व्यक्त केलेली ‘ही’ इच्छा, मेकअप आर्टिस्टने सांगितला भावूक प्रसंग

Web Title: Based on the waghya murali tradition phula powerful trailer raises excitement set to release on this date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi News
  • Official Trailer

संबंधित बातम्या

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी
1

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा
2

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
3

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द
4

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.