Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रामीण महाराष्ट्राची रंगतदार कथा, ‘भागूबाई’ ट्रेलर रिलीज; Nirmiti Sawant पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार

ग्रामीण महाराष्ट्राच्या रंगतदार पार्श्वभूमीवर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणार आहे. ट्रेलरमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली असून चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 13, 2026 | 04:41 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री Nirmiti Sawant पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘भागूबाई’ या आगामी चित्रपटात त्या मुख्य भूमिकेत दिसणार असून आज या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.ग्रामीण महाराष्ट्राच्या रंगतदार पार्श्वभूमीवर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणार आहे. ट्रेलरमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली असून चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. ‘भागूबाई’ हा चित्रपट २४ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘भागूबाई’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘भागूबाई’ या खट्याळ, बिनधास्त आणि गप्पिष्ट बाईची मजेशीर दुनिया पाहायला मिळते. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये नाक खुपसत ती गावात गोंधळ माजवते आणि साध्या घटनांना मोठं रूप देत नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करते. पण या सगळ्या विनोदामागे एक गंभीर सत्य दडलेलं असल्याची झलकही ट्रेलरमध्ये दिसते.

या चित्रपटाचा गाभा म्हणजे निर्मिती सावंत यांची मुख्य भूमिका. त्यांच्या खास कॉमिक टायमिंगसोबतच भावनिक अभिनयाची झलक यात पाहायला मिळते. ‘सुपर डुपर’ मधील यशानंतर त्या पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपलंसं वाटेल अशी, मातीशी जोडलेली व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.

“सौंदर्य आहे, पण अक्कल नाही…”, आशा भोसले यांचे निधन, मात्र अभिनेत्री Athiya Shetty ने वाहिली लता मंगेशकरांना श्रद्धांजली

चित्रपटातील कलाकार
चित्रपटात भार्गवी चिरमुले, शशांक शेंडे, मंगेश देसाई, विजय पाटकर, नागेश भोंसले आणि निखिल चव्हाण यांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.भागुबाई चित्रपटाची कथा एका अशा बाई भोवती फिरते, जिला गावातल्या गप्पा आणि कुचाळक्या करण्यात विशेष आनंद मिळतो. मात्र तिच्या आयुष्यात घडणारी एक अनपेक्षित घटना सगळंच चित्र बदलून टाकते. त्या घटनेनंतर तिच्या आयुष्यात आणि गावात काय बदल होतात हे या चित्रपटात पाहायला मिळेल.

Asha Bhosle Death: ‘गातागाता प्राण जावेत’,आशा भोसले यांची अखेरची इच्छा; चाहत्यांचे डोळे पाणावले

या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय अमर यांनी केलेलं असून वास्तवाशी जोडलेली आणि भावनिक स्पर्श असलेली ही कथा प्रेक्षकांना नक्कीच भावेल, तर निर्माती श्रद्धा पटेल यांनी ही कथा प्रेक्षकांपर्यंत भावनिक पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
हास्य, नाती आणि लपलेलं सत्य यांचा सुरेख मेळ साधणारा ‘भागूबाई’ हा चित्रपट एक वेगळा आणि मनोरंजक अनुभव देण्याचं आश्वासन देतो.

Web Title: Bhagubai trailer released nirmiti sawant return to the big screen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

Dwidha Marathi Movie : ‘द्विधा’ चित्रपटातून उलगडणार भाऊ-बहिणीच्या नात्यातील खास बॉन्डिंग ;’आदि-श्रावणी’ची केमिस्ट्री चर्चेत
1

Dwidha Marathi Movie : ‘द्विधा’ चित्रपटातून उलगडणार भाऊ-बहिणीच्या नात्यातील खास बॉन्डिंग ;’आदि-श्रावणी’ची केमिस्ट्री चर्चेत

Mrityu Chakra Movie: गुरु’ नेमका कोण? पुष्कराज चिरपुटकरच्या भूमिकेने वाढवलं ‘मृत्यूचक्र’चं गूढ
2

Mrityu Chakra Movie: गुरु’ नेमका कोण? पुष्कराज चिरपुटकरच्या भूमिकेने वाढवलं ‘मृत्यूचक्र’चं गूढ

Abhishek Bachchan ETPL: अभिषेक बच्चनने केला European T20 Premier League चा श्रीगणेशा; मैदानावरून शेअर केला खास फोटो
3

Abhishek Bachchan ETPL: अभिषेक बच्चनने केला European T20 Premier League चा श्रीगणेशा; मैदानावरून शेअर केला खास फोटो

Salman Khan 38 Years:‘प्रेम’च्या रोमँटिक अंदाजापासून ‘टायगर’च्या ॲक्शनपर्यंत; सलमान खानचा ३८ वर्षांचा सुपरहिट प्रवास
4

Salman Khan 38 Years:‘प्रेम’च्या रोमँटिक अंदाजापासून ‘टायगर’च्या ॲक्शनपर्यंत; सलमान खानचा ३८ वर्षांचा सुपरहिट प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.