Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ नव्या पिढीच्या भेटीला नव्या विचारांचं नाटक

'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ हे नवीन नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय' या नाटकाद्वारे नवीन पिढी नवा विषय घेऊन रंगमंचावर प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 16, 2025 | 03:52 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ नव्या पिढीच्या भेटीस
  • नव्या विचारांसह रंगमंचावर सादर होणार नाटक
  • एकांकिके स्पर्धेतही नाटकाने मारली बाजी

गेल्या दोन वर्षांपासून पुण्याचा लेखक-दिग्दर्शक विनोद रत्ना आणि त्याच्या ग्रुपने एकापाठोपाठ एकांकिका स्पर्धा जिंकून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावर्षी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वच्या सर्व पारितोषिकं ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ या एकांकिकेने पटकावली. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना या सर्वच स्तरावर काही नवे प्रयोग त्यात केलेले दिसले.

येत्या दिवाळीत सिनेमागृहात धमाका! ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाचा होतोय गाजावाजा, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्यानेही दिल्या शुभेच्छा

याच एकांकिकेचं पूर्ण लांबीच्या नाटकात केलेलं रुपांतर मराठी रंगभूमीदिनाच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबर २०२५ रोजी व्यावसायिक रंगभूमीवर येत आहे. चंद्रकांत कुलकर्णी हे नाटक सादर करणार असून, यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे ओरिजिनल संचातच ही ऊर्जावान रंगकर्मी मंडळी आपल्याला मुख्यधारेतल्या रंगभूमीवर दिसणार आहेत. ‘जिगीषा’ संस्थेची ही निर्मिती असून नाटकाच्या तालमी जोरात सुरु आहेत. तसेच या नाटकातून प्रेक्षकांना नवीन गोष्टींचा अनुभव मिळणार आहे.

एकांकिका, दीर्घांक स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा, समांतर रंगभूमीवरुन व्यावसायिक रंगभूमीवर येण्याचा हा नाट्यप्रवास महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना परिचित आहेच पण अत्यंत सळसळत्या ऊर्जेची, नव्या पिढीची, नव्या दमाची लेखक-दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्रींची टीम यानिमित्ताने कार्यरत होते. ‘ऑल दि बेस्ट’, ‘मनोमिलन’ अशा उदाहरणांनी हे घवघवीत यश या आधीही अधोरेखित झाले आहे.

‘पारू’ मालिकेत नवा ट्विस्ट! महासंगमात उलगडणार जुना गुन्हा, सारंग–आदित्य अडकणार अडचणीत

आशय-विषय मांडणीत असलेला हा नव्या पिढीचा दृष्टीकोन नाविन्यपूर्ण आणि वेगळ्या रंगमंचीय शक्यतांना सामोरं जाताना दिसतो. नव्या जेन झी पिढीची ही नवलकथा रंगमंचावर आणताना आम्हाला नव्या पिढीशी एक नातं निर्माण करण्याची संधी मिळतेय. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वसा देण्याचा आमचा उद्देश आहे अशी प्रतिक्रिया निर्माते श्रीपाद पद्माकर, दिलीप जाधव आणि सादरकर्ते चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिली आहे. लेखन-दिग्दर्शनाची दुहेरी धुरा सांभाळणाऱ्या विनोद रत्ना आणि बक्षिसांची लयलूट करणाऱ्या समृद्धी कुलकर्णी, श्रेयस जोशी, वैभव रंधवे या कलावंतांच्या नव्या सादरीकरणाला महाराष्ट्रातले जाणकार प्रेक्षक भरभरुन दाद देतील अशीही अपेक्षा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Chiranjeev punes one act play chiranjeev perfect bighadlay wins top prize at state level natya parishad karandak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘पारू’ मालिकेत नवा ट्विस्ट! महासंगमात उलगडणार जुना गुन्हा, सारंग–आदित्य अडकणार अडचणीत
1

‘पारू’ मालिकेत नवा ट्विस्ट! महासंगमात उलगडणार जुना गुन्हा, सारंग–आदित्य अडकणार अडचणीत

येत्या दिवाळीत सिनेमागृहात धमाका! ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाचा होतोय गाजावाजा, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्यानेही दिल्या शुभेच्छा
2

येत्या दिवाळीत सिनेमागृहात धमाका! ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाचा होतोय गाजावाजा, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्यानेही दिल्या शुभेच्छा

Bigg Boss 19 : अमाल मलिकचा पारा चढला, फरहानाची जेवण्याची प्लेट फोडली! अजून किती सलमान स्पर्धकाची घेणार बाजू?
3

Bigg Boss 19 : अमाल मलिकचा पारा चढला, फरहानाची जेवण्याची प्लेट फोडली! अजून किती सलमान स्पर्धकाची घेणार बाजू?

Entertainment Queen राखी सावंत अखेर ‘बिग बॉस १९’ मध्ये करणार एन्ट्री, चाहत्यांना म्हणाली, ‘मला वोट करा…’
4

Entertainment Queen राखी सावंत अखेर ‘बिग बॉस १९’ मध्ये करणार एन्ट्री, चाहत्यांना म्हणाली, ‘मला वोट करा…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.