(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘प्रेमाची गोष्ट २’ हा मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटामधील नुकतीच रिलीज झालेली सगळी गाणी हिट होत आहेत. अश्यातच आता दिवाळीच्यानिमित्त चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील करताना दिसत आहेत. चित्रपटामधील संपूर्ण स्टारकास्ट देखील तंगडी आहे. ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी, भाऊ कदम हे सगळे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत .
चित्रपटाच्या स्टारकास्टने दिली कंदील गल्लीला भेट
दिवाळीच्या आनंदात अधिक भर घालण्यासाठी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा ‘प्रेमाची गोष्ट २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने चित्रपटातील कलाकार ललित प्रभाकर, ऋचा वैद्य आणि रिधिमा पंडित यांनी माहिम येथील प्रसिद्ध कंदील गल्लीला भेट दिली. दिवाळीच्या रंगीबेरंगी आणि आनंददायी वातावरणात खरेदीचा आनंद लुटत, स्थानिकांशी मनमोकळा संवाद साधत, चित्रपटाविषयीचा उत्साह व्यक्त केला आणि सर्वांना थिएटरमध्ये ‘प्रेमाची गोष्ट २’ पाहण्याचं आवाहन केलं. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाचे संजय छाब्रिया निर्माते असून, अमित भानुशाली चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट येत्या २१ ऑक्टोबर संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेत्यानेही केले कौतुक
बॉलीवूड अभिनेता सोनू सूद यांनी आपल्या सोशल मीडियावरून ‘प्रेमाची गोष्ट २’ या रिधिमा पंडितच्या पहिल्या मराठी चित्रपटासाठी शुभेच्छा देत, चित्रपटाच्या संपूर्ण टीमलाही या चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेतायने चित्रपटाचे पोस्टर स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंट शेअर केले आहे. बॉलीवूड अभिनेत्याचा हा मराठी चित्रपटांना दिलेला पाठींबा पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत.
चित्रपटाबद्दल सांगायचे झालं तर, प्रेम आणि नशिबाचा हा सुंदर प्रवास प्रेक्षकांना एक नवा, ताजातवाना अनुभव हा चित्रपट देणार आहे. एक नवी प्रेम कथा हा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर मांडण्यासाठी सज्ज आहे. आता हा चित्रपट आता प्रेक्षकांना आवडतोय का नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच चित्रपटाच्या सगळ्या गाण्यांना जसा प्रतिसाद मिळत आहे असाच प्रतिसाद चित्रपटालाही मिळेल अशी आशा आहे.