
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
दत्तजयंतीच्या पावन मुहूर्तावर कलर्स मराठी प्रेक्षकांसमोर ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेचा विशेष सप्ताह घेऊन येत आहे. ४ ते १० डिसेंबर या कालावधीत प्रसारित होणारे भाग स्वामी समर्थांच्या दत्त अवताराचे रहस्य, त्यांच्या भक्तांवरील कृपा, लीला आणि ब्रह्मा–विष्णू–महेश या त्रिदेवांच्या शक्तींचं दर्शन प्रेक्षकांना देतील.
दत्त म्हणजे उत्पत्ती, पालन आणि संहार यांचा परम संगम आणि या तीन शक्तींचं दिव्य प्रगटीकरण प्रेक्षकांना प्रथमच एका सलग कथेत आठवडाभर विस्ताराने अनुभवायला मिळणार आहे.ही विशेष कथा रंजना नावाच्या एका तरुणीच्या संघर्षमय आयुष्याभोवती फिरते, जिथे काका-काकूंचा छळ, भावाचा जीवघेणा आजार आणि गावगुंड अभिरामच्या अत्याचारामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं दिसतं. आजच्या काळाचे प्रतिबिंब असलेल्या़ रंजनाच्या असहाय हाकेला स्वामी कसे उत्तर देतात आणि प्रत्यक्ष स्वामी समर्थ तीन रूपांत कसे प्रकट होतात ब्रह्मरूप प्रजापती, विष्णूरूप नारायण आणि रुद्ररूप महेश या रूपात वेगवेगळे येण्याचे त्यांचे प्रयोजन काय ? उत्पत्ती, पालन आणि संहार तत्त्वाच्या या तिन्ही दैवी शक्ती एकत्र आल्यानंतर घडणारा चमत्कार नेमका काय असेल याची उत्तरे या दत्तजयंती विशेष सप्ताहात मिळणार आहेत. अध्यात्म, भक्ती, चमत्कार आणि मानवी भावनांचा सुंदर संगम असलेले हे विशेष भाग प्रेक्षकांना श्री गुरुदेव दत्ताच्या कृपेची दिव्य अनुभूती देतील.
जय जय स्वामी समर्थ” ही एक अत्यंत लोकप्रिय आणि श्रद्धास्थान असलेली मराठी टीव्ही मालिका आहे, ही मालिका स्वामी समर्थयांचे जीवन आणि त्यांचे अद्भुत कार्य दर्शवते. स्वामी समर्थ हे आध्यात्मिक गुरु, संत आणि चमत्कारी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात, आणि त्यांची उपदेशे आणि लीलांमुळे अनेक लोकांचे जीवन बदलेले आहे.मालिकेची कथा स्वामी समर्थ यांच्या अद्भुत लीलांवर आधारित आहे. यामध्ये स्वामींच्या जीवनातील मुख्य घटनांचे आणि चमत्कारांचे चित्रण केले जाते. त्यात स्वामींच्या शिक्षणाने प्रभावित झालेल्या भक्तांचा संघर्ष आणि आध्यात्मिक मार्गदर्शन दाखवले जाते.
लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती ‘मृदगंध पुरस्कार २०२५’ दिमाखात वितरण,भीमराव पांचाळे यांना जीवनगौरव