Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रुबाब’च्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रदर्शित; तरुणाईच्या स्वॅगदार प्रेमाची ठसकेबाज झलक

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत 'रुबाब' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा पार पडला आहे. तसेच हा चित्रपट आता लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 21, 2026 | 10:24 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘रुबाब’च्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रदर्शित
  • तरुणाईच्या स्वॅगदार प्रेमाची ठसकेबाज झलक
  • ‘रुबाब’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 

मराठी सिनेसृष्टीत सातत्याने वेगळ्या धाटणीचे, काळाशी सुसंगत प्रयोग सादर करणारे झी स्टुडिओज पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक डॅशिंग, स्टायलिश आणि मनाला भिडणारी लव्हस्टोरी घेऊन येत आहेत. या बहुप्रतीक्षित ‘रुबाब’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत पार पडला. पहिल्याच क्षणापासून ट्रेलरने तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे.

‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ ही लक्षवेधी टॅगलाईन घेऊन आलेला ‘रुबाब’ केवळ एक प्रेमकहाणी नसून, स्वतःच्या अटींवर जगणाऱ्या, आत्मसन्मान जपणाऱ्या आणि प्रेमासाठी ठाम उभ्या राहाणाऱ्या आजच्या तरुणाईची गोष्ट आहे. एक रुबाबदार, स्वॅग असलेला नायक, त्याची ड्रीम गर्ल आणि त्यांचं गोड, हळवं आणि तितकंच बेधडक प्रेम ट्रेलरमध्ये दिसते. मात्र या प्रेमाच्या वाटेत उभा आहे समाज, कुटुंब आणि अनेक विरोधकांचा भक्कम अडथळा या सगळ्यावर मात करून त्यांची प्रेम कहाणी कशी सुरु राहते हे सगळं चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

प्रेम, संघर्ष आणि स्वाभिमान यांच्या संगमातून उभं राहिलेलं हे नातं जिंकेल की, समाजाच्या दबावापुढे झुकेल? याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपटगृहातच मिळणार आहे. दरम्यान, ट्रेलरमधील रोमँटिक केमिस्ट्री, ठसकेबाज संवाद, स्टायलिश सादरीकरण, दमदार पार्श्वसंगीत आणि ऊर्जेने भरलेली दृश्यं यामुळे ‘रुबाब’चा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

The Raja Saab Box Office Collection Day 12: दुसऱ्या आठवड्यात ‘द राजा साब’ बॉक्स ऑफिसवर घसरला, कमाईत मोठी घट

यावेळी नागराज मंजुळे चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देत म्हणाले, “ शेखर माझा खूप चांगला मित्र आहे. आणि त्याचे दिग्दर्शन कमाल आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच कळते की, या चित्रपटाची कथा काहीतरी वेगळी आहे. संभाजी व शितल यांची जोडीही चित्रपटाच्या नावाप्रमाणेच रुबाबदार दिसत आहे. चित्रपटाचे शूट अतिशय सुंदर आणि भव्य पद्धतीने साकारले असून अप्रतिम संगीत आहे. तसेच दोघांची ऑनस्क्रीन जोडी अतिशय प्रभावी वाटते. ट्रेलर पाहताच हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढते. मी शेखरला व चित्रपटाच्या संपूर्ण टीमला सदिच्छा देतो. मला आशा आहे, हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल.”

 

चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणाले, ” या चित्रपटाची कथा खरंतर मला २०१८ मध्येच सुचली होती ती आता प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. ‘रुबाब’ या चित्रपटात स्वतःची ओळख ठामपणे जपणाऱ्या तरुणाईचा प्रवास दाखवण्यात आला आहे. आजच्या पिढीचं प्रेम बेधडक, स्पष्ट आणि स्वाभिमान जपणारं असतं. हाच रुबाब या चित्रपटात दिसणार आहे. प्रेमासाठी उभं राहाण्याची, आपल्या तत्त्वांवर जगण्याची आणि भावना निर्भीडपणे व्यक्त करण्याची ही कथा आहे. हा प्रेमाचा रुबाब प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे.”

झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर सांगतात, ” झी स्टुडिओज नेहमीच नव्या दिग्दर्शकांना संधी देण्यावर विश्वास ठेवते, आणि शेखर हा त्याच विश्वासाचा उत्तम उदाहरण आहे. शेखरसारखा कमालीचा, प्रतिभावान दिग्दर्शक प्रेक्षकांसाठी उत्कृष्ट कलाकृती घेऊन येत आहे. प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नव्हे, तर स्वतःशी जोडणाऱ्या कथा पाहायला आवडतात. जिथे प्रेम, स्वप्नं आणि आत्मसन्मान एकत्र येतात, अशी ही कथा आहे. स्क्रिप्ट कागदाशिवाय सांगता येते हे मला शेखरमुळे कळले. शेखरसारखा कमालीचा दिग्दर्शक प्रेक्षकांसाठी उत्कृष्ट कलाकृती घेऊन येत आहे. ‘रुबाब’ हा चित्रपट तरुणाईच्या भावविश्वाला स्पर्श करणारा असून, त्यांची ऊर्जा आणि जिद्द मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे दिसून येईल. ही रुबाबदार लव्हस्टोरी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

Bigg Boss Marathi 6 : राशनच्या गोण्यांसाठी बिग बॉसच्या घरात होणार तुफान राडा, ‘हे’ दोन स्पर्धक आमनेसामने, पाहा प्रोमो

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. ६ फेब्रुवारीपासून सर्वत्र प्रदर्शित होणारा ‘रुबाब’ हा चित्रपट तरुणाईच्या प्रेमाची, स्वाभिमानाची आणि स्वॅगची गोष्ट मोठ्या पडद्यावर मांडणारा आहे. ट्रेलरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Web Title: Director shekhar bapu rankhambe rubaab marathi movie trailer out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: वारी-हिंगोणी रस्त्याची दुरावस्था! उपोषणावर शेकडो तरुण ठाम, रस्ता डांबरीकरणासाठी तहसीलदारांना निवेदन
1

Ahilyanagar News: वारी-हिंगोणी रस्त्याची दुरावस्था! उपोषणावर शेकडो तरुण ठाम, रस्ता डांबरीकरणासाठी तहसीलदारांना निवेदन

Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका
2

Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध
3

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Ahilyanagar News: चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट घरावर आदळला, मोठी जीवितहानी टळली
4

Ahilyanagar News: चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट घरावर आदळला, मोठी जीवितहानी टळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.