Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी साहित्याची नवी झेप, डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ला पुरस्कार जाहीर

प्रतिष्ठित साहित्य अकादमीन आणि बाल साहित्य पुरस्कार २०२५ चे वितरण नवी दिल्ली येथे संपन्न झाले असून कवी डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 15, 2025 | 12:35 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

प्रतिष्ठित साहित्य अकादमीन आणि बाल साहित्य पुरस्कार २०२५ चे वितरण नवी दिल्ली येथे संपन्न झाले. यात मराठीसाठीचा पुरस्कार ज्येष्ठ बाल साहित्यकार व कवी डॉ. सुरेश सावंत यांना ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहासाठी प्रदान करण्यात आला. डॉ. सावंत यांच्यासह देशातील २४ भाषांमधील साहित्यकारांना हा सन्मान मिळाला. पुरस्कार वितरण सोहळा तानसेन मार्गावरील त्रिवेणी कला संगम येथे झाला.

साहित्य अकादेमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून प्रख्यात गुजराती लेखिका वर्षा दास , उपाध्यक्षा कुमुद शर्मा, सचिव पल्लवी प्रशांत होळकर उपस्थित होत्या.प्रत्येक विजेत्याला मानपत्र आणि ५०,००० रुपये रोख रक्कम देण्यात आली. पुरस्कारांची घोषणा १८ जून २०२५ रोजी करण्यात आली होती.

 

आभाळमाया’चे वैशिष्ट्य आणि डॉ. सावंत यांचे योगदान

डॉ. सुरेश सावंत हे मराठी बाल साहित्यातील दिग्गज नाव आहे. ‘आभाळमाया’मधील कविता मुलांच्या कल्पनाविश्वाला हात घालतात. साधी, भावपूर्ण आणि कल्पनाशील भाषेत लिहिलेल्या या रचना निसर्ग, आकाश, स्वप्ने आणि बालमनाशी जोडलेल्या आहेत. लहान मुलांना आनंद, समज आणि सौंदर्यदृष्टी देणाऱ्या या कविता त्यांच्या लेखनशैलीचे उत्तम उदाहरण आहेत.

डॉ. सावंत हे केवळ कवी नसून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्य व संशोधकही आहेत. ‘बाल साहित्याचा इतिहास’, ‘आंबेडकरी साहित्य’, ‘समाज परिवर्तनाचे साहित्य’ यासारख्या विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. ‘नंदादीप’, ‘टिंबूपट’ ही त्यांची पुस्तके वाचकांच्या मनात घर करून आहेत, तर ‘आमच्यामया’ या कादंबरीने बालवाचकांना नवदृष्टी दिली आहे. विद्यापीठ पातळीवर त्यांनी अनेक ग्रंथांचे संपादन आणि संशोधन केले आहे. मराठी पुरस्कार निवड समितीत एकनाथ आव्हाड, श्रीमती सोनाली नवांगुळ आणि लक्ष्मण कडू यांचा समावेश होता.

Bigg Boss 19 : खरं की काय? कुनिका सदानंद मालती चहरला म्हणाली ‘लेस्बियन’ तान्या मित्तलला सांगितली की, “मला खात्री आहे…”

इतर २३ भाषांमधील विजेते

डॉ. सावंत यांच्यासह असमियासाठी सुरेंद्र मोहन दास (‘मइनाहंतर पद्य’ – कविता), बांगलासाठी त्रिदिब कुमार चट्टोपाध्याय (‘एखनउ गाये काँटा देय’ – कहानी), बोडोसाठी बिनय कुमार ब्रह्म (‘खान्थि बोसोन आरो आखु दानाय’ – कहानी), डोगरीसाठी पी.एल.परिहार ‘शौक़’ (‘नन्हींटोर’ – कविता), इंग्रजीसाठी नितिन कुशलप्पाएमपी (‘दक्षिण, साउथ इंडियन मिथ्स अँड फै़ब्लस रिटोल्ड’ – कहानी), गुजरातींसाठी कीर्तिदा ब्रह्मभट्ट (‘टिंचाक’ – कविता), हिंदीसाठी सुशील शुक्ल (‘एक बटे बारह’ – संस्मरण), कन्नडसाठी के. शिवलिंगप्पा हंदिहाल (‘नोटबुक’ – कहानी), कश्मीरीसाठी इज़हार मुबशिर (‘शुरे ते चुरे ग्युश’ – कहानी), कोंकणीसाठी नयना आडारकार (‘बेलाबायचो शंकर आनी हेर काणयो’ – कहानी), मैथिलीसाठी मुन्नी कामत (‘चुक्का’ – कहानी), मलयाळमसाठी श्रीजित मुत्तेडत्तु (‘पेन्गिनुकळुडे वन्करायळ’ – उपन्यास), मणिपुरीसाठी शांतो एम (‘अंगाङ्शिङ्गी शान्बुङ्सिदा’ – नाटक), नेपाळीसाठी साङ्मुलेप्चा (‘शान्ति वन’ – उपन्यास), ओडिआसाठी राजकिशोर पाढ़ी (‘केते फुल फुटिचि’ – कविता), पंजाबीसाठी पाली खादिम (अमृत पाल सिंह) (‘जादू पत्ता’ – उपन्यास), राजस्थानीसाठी भोगीलाल पाटीदार (‘पंखेरुवं नी पीड़ा’ – नाटक), संस्कृतसाठी प्रीति पुजारा (‘बालविश्वम्’ – कविता), संतालीसाठी हरलाल मुर्मु (‘सोना मीरु-वाक् सांदेश’ – कविता), सिंधीसाठी हीना अगनाणी ‘हीर’ (‘आसमानी परी’ – कविता), तमिळसाठी विष्णुपुरम सरवणन (‘ओट्राइचिरगु ओविया’ – उपन्यास), तेलुगुसाठी गंगिशेट्टी शिवकुमार (‘कबुर्ला देवता’ – कहानी) आणि उर्दूसाठी ग़ज़नफ़र इक्बाल (‘क़ौमी सितारे’ – लेख) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

अभिनेता रुचिर गुरव साकारणार ‘सावल्याची जणू सावली’ मालिकेतील ‘सोहम’ हे पात्र!

Web Title: Dr suresh sawants aabhaalmaya announced as award winner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 12:35 PM

Topics:  

  • awarded
  • Entertainemnt News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
1

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?
3

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत
4

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.