फोटो सौजन्य - Social Media
बिग बॉसने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये Eviction झालेलं दिसून येत आहे. Eviction साठी मंचावर पूर्ण Alliance Team च उभी असल्याचे दिसून येत आहे. बाल्कनी टीमचे उरलेले सदस्य प्राजक्ता शुक्रे आणि सागर कारंडे दिसून येत आहे, तर त्याच बाजूला मंचावर टोळीचे उर्वरित सदस्य रुचिता जामदार आणि विशाल कोटियन उभे असल्याचे दिसून येत आहे. रितेशने Evicted सदस्याचे नाव जाहीर केल्यावर रुचिता रडताना दिसत आहे, त्याचबरोबर विशालही रडताना दिसत आहे, त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी ‘रुचिता’ घराबाहेर जाणार असल्याचे स्वतःच जाहीर केले आहे, परंतु येथे खेळ वेगळा आहे कारण ‘हे सीजन 6 आहे आणि येथे Twist Fix आहे.”
Promo मध्ये सागर आणि रुचिता एकमेकांना मिठी मारत रडताना दिसत आहेत. त्याचबरोबर सागरला दीपालीही मिठी मारून रडताना दिसत आहे. आता प्रश्न येतो की समजा रुचिता घराबाहेर जात असेल तर दीपाली का म्हणून सागरला मिठी मारून रडेल? प्रोमोमध्ये एकदाही विशाल रुचिताला मिठीत घेऊन रडताना दिसत नाहीये. याचा निष्कर्ष एकच निघतो की आजच्या भागात सागर Evict होणार आहे. पण सत्य काय हे आजच्या भागातच माहिती पडेल, त्यामुळे हा केवळ एक अंदाज आहे.
सोशल मीडियावर प्रेक्षकांनी या promo खाली वेगवेगळे अंदाज बांधले आहेत, त्यातील बहुतेक अंदाजामध्ये रुचिता घराबाहेर जाणार असे वाचण्यात येत आहे परंतु काहींनी बारकाईने हे Promo पहिले असतील आणि त्यांच्या अंदाजात सागर Evict झाला आहे. बिग बॉसने या promo च्या माध्यमातून प्रेक्षकांचा एक Perspective (दृष्टी) सेट करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून लोकांना वाटेल की “होय, आज रुचिता जाणार!” पण रितेश म्हणतात ना “हे सीजन Six आहे आणि येथे ट्विस्ट Fix आहे.”






