Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समाजातील प्रत्येक संघटनेची गोष्ट सांगणारा “जयभीम पँथर” चा पोस्टर रिलीज, वेधलं लक्ष…

मराठी चित्रपट "जयभीम पँथर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. समाजातील प्रत्येक संघटनेची गोष्ट सांगणारा "जयभीम पँथर" या चित्रपटाचे नुकतेच नवे पोस्टर रिलीज झाले आहे. हा चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 17, 2025 | 03:01 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या नवयान ड्रीम फिल्म प्रॉडक्शन निर्मित “जयभीम पँथर” एक संघर्ष  या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच मा. संजय भाऊ खंडागळे (मुंबई अध्यक्ष टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते लाँच करण्यात आले याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. निशांत नाथाराम धापसे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून एका संघटनेच्या संघर्षाची कहाणी या चित्रपटातून मांडली आहे. तसेच हा चित्रपट ११ एप्रिलला संपूर्ण सिनेमागृहात दाखल होणार आहे.

Taapsee Pannu: ‘गांधारी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण; अभिनेत्रीने शेअर केला अनुभव!

भदंत शीलबोधी थेरो यांच्या नवयान ड्रीम फिल्म प्रॉडक्शनद्वारे निर्मिती होत असलेला “जयभीम पँथर” एक संघर्ष हा महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. आयु. रामभाऊ तायडे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संपूर्ण बौद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील भारत निर्माण करण्यासाठी चित्रपट, मालिका अशा माध्यमातून नवनिर्मिती करण्याचा या निर्मिती संस्थेचा मानस आहे. लेखक दिग्दर्शक निशांत नाथाराम धापसे यांनी आतापर्यंत हलाल, भोंगा, भारत माझा देश आहे अशा अनेक चित्रपटांचे लेखक म्हणून, तर “अंकुश”, “रंगीले फंटर” हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या चित्रपटांना अनेक महोत्सवांमध्ये पुरस्कार, राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.

“जयभीम पँथर” एक संघर्ष या चित्रपटात गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, मिलिंद शिंदे, अभिजीत चव्हाण, सोनाली पाटील, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, संजय कुलकर्णी, प्रवीण डाळिंबकर, विनय धाकडे, प्रियांका उबाळे अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला पहायला मिळणार आहे. योगेश कोळी छायाचित्रण, संकलन निलेश गावंड, वेशभूषा कोमल शेळके तर प्रकाश सिनगारे यांनी कलादिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. चित्रपटला संगीत पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांचे असून सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, अजय देहाडे, शुभम म्हस्के यांचा सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. संतोष गाडे यांनी प्रोजेक्ट हेड तर बाबासाहेब पाटील यांनी कार्यकारी निर्माते म्हणून काम पाहिले आहे.

विरळ केस अन् डोक्यावर टक्कल… पुष्कर जोगच्या नव्या लूकची सर्वत्र चर्चा…

बहुजन समाजातील प्रत्येक संघटनेच्या जडणघडणेचा संघर्ष हा या चित्रपटाचा आशय आहे. समाजातील अन्याय अत्याचाराविरुद्ध उभ्या राहणाऱ्या अनेक संघटनांसोबत काय होते, यांची रंजक गोष्ट या चित्रपटातून रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे, बहुजन संघटनेमध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना हा चित्रपट आपलासा वाटेल असे चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक निशांत धापसे यांनी सांगितले आहे.

Web Title: Jai bhim panther marathi film will be released on april 2025 know details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi film

संबंधित बातम्या

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम
1

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम

Fauji Marathi Movie: शून्यातून उभा राहिला ‘फौजी’! जिद्द, संघर्ष अन् देशप्रेमाची कहाणी; ‘या’ दिवशी होणार रिलीज
2

Fauji Marathi Movie: शून्यातून उभा राहिला ‘फौजी’! जिद्द, संघर्ष अन् देशप्रेमाची कहाणी; ‘या’ दिवशी होणार रिलीज

३० मिनिटांचा प्रयोग अन् महिन्यांची धडपड; ‘पुरुषोत्तम’च्या निमित्ताने समोर आली रंगमंचामागची रंजक दुनिया
3

३० मिनिटांचा प्रयोग अन् महिन्यांची धडपड; ‘पुरुषोत्तम’च्या निमित्ताने समोर आली रंगमंचामागची रंजक दुनिया

Miss Call Song : मानसी नाईक यांच्या हस्ते ‘मिस कॉल’ गाण्याचं ग्रँड लाँच; बॉलिवूड कोरिओग्राफर मिष्टी भवारचे संगीत क्षेत्रात पदार्पण
4

Miss Call Song : मानसी नाईक यांच्या हस्ते ‘मिस कॉल’ गाण्याचं ग्रँड लाँच; बॉलिवूड कोरिओग्राफर मिष्टी भवारचे संगीत क्षेत्रात पदार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.