Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केदार शिंदे यांचा नवा प्रयोग; लेकीसोबत घेऊन येणार ‘आई भाड्याने हवी?’ हा आगामी चित्रपट

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांचा नवा प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘आई’च्या भावनांवर आधारित वेगळी कथा लवकरच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘आई भाड्याने हवी?’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 20, 2026 | 03:02 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • केदार शिंदे यांचा नवा चित्रपट
  • ‘आई भाड्याने हवी?’ आगामी चित्रपटाची घोषणा
  • लेकीसोबत घेऊन येणार नवा चित्रपट
 

मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे दिग्दर्शक केदार शिंदे आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेसह येत आहेत. ‘अगंबाई…अरेच्चा!’, ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या यशस्वी चित्रपटांनंतर त्यांनी आपल्या आगामी ‘आई भाड्याने हवी?’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. या वेगळ्या आणि लक्षवेधी शीर्षकामुळेच चित्रपटाबद्दलची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे.

सनफ्लॉवर स्टुडिओ निर्मित या चित्रपटाची कथा आणि लेखन वैशाली शशी नाईक आणि ओंकार वसुंधरा दत्त यांनी केले आहे, तर छायांकन आणि संकलनाची जबाबदारी मयुर संजिवनी हरदास यांनी सांभाळली आहे. विशेष म्हणजे, ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’नंतर निर्माती सना शिंदे, दिग्दर्शक केदार शिंदे, लेखिका वैशाली शशी नाईक आणि लेखक ओंकार वसुंधरा दत्त ही यशस्वी टीम पुन्हा एकदा एकत्र येत असल्याने चित्रपटाकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मराठी अभिनेत्याने सुरू केला ‘हा’ पारंपारिक व्यवसाय, कोकणातल्या ‘या’ अभिनेत्याचे होतय कौतुक

या चित्रपटाबद्दल बोलताना केदार शिंदे म्हणाले की, “स्त्रीप्रधान विषय हाताळणे ही नेहमीच जबाबदारीची आणि आव्हानात्मक गोष्ट असते. जोपर्यंत कथा मनाला भिडत नाही, तोपर्यंत अशा चित्रपटाची सुरुवात करायची नाही, असा माझा ठाम निर्धार आहे. ‘आई भाड्याने हवी?’ हा चित्रपट केवळ मनोरंजन करणारा नाही, तर ‘आई’ या नात्याचा गाभा मांडणारा आणि मनाला स्पर्श करून जाणारा अनुभव आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, या चित्रपटात राजकुमार हिरानी यांच्या शैलीची हलकीशी झलक पाहायला मिळेल, जिथे मनोरंजनासोबतच एक प्रभावी संदेशही दिला जातो.

तसेच निर्माती सना शिंदेने चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले की, “पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे या नव्या चित्रपटाबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे. ‘आई भाड्याने हवी?’ हा पूर्णपणे मनोरंजनप्रधान, रंगतदार आणि मल्टीस्टारर चित्रपट असेल. यात नातेसंबंध, भावना आणि विनोद यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळेल.”

‘आई भाड्याने हवी?’ या शीर्षकातूनच आजच्या बदलत्या कुटुंबव्यवस्थेतील भावनिक वास्तव अधोरेखित होतं. ‘आई’ या नात्याची गरज, तिची उणीव आणि त्यामागील भावनिक पोकळी यावर हा चित्रपट हलक्याफुलक्या पण प्रभावी पद्धतीने भाष्य करणार आहे. आधुनिक जीवनशैलीत बदलत चाललेल्या नातेसंबंधांच्या पार्श्वभूमीवर हा विषय प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ठरण्याची शक्यता आहे.

‘राजा शिवाजी’ टीझरला प्रेक्षकांची पसंती; Riteish Deshmukh चा शिवराय अवतार पाहून प्रेक्षक भावूक

एकीकडे धमाल, हसवणूक आणि मनोरंजन, तर दुसरीकडे अंतर्मुख करणारा आशय या दुहेरी ताकदीमुळे ‘आई भाड्याने हवी?’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळाच सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. सध्या चित्रपटासाठी कलाकारांची निवड सुरू असून, विविध वयोगटातील ‘आई’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. जून-जुलैमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. आता या वेगळ्या संकल्पनेतून ‘आई’च्या शोधाची कथा नेमकी कशी उलगडते, हे पाहण्यासाठी प्रेक्षक निश्चितच उत्सुक आहेत.

Web Title: Kedar shinde announces aai bhadyane havi marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • entertainment
  • kedar shinde
  • marathi movie

संबंधित बातम्या

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
1

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
2

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं
3

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?
4

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.