Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam चित्रपटाचा परदेशातही डंका! ‘या’ ठिकाणी प्रदर्शित होणार चित्रपट; कलाकारांनी दिली खुशखबर

'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' हा चित्रपट सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे, आणि अशातच चित्रपट आता जगभर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट आता परदेशातही रिलीज होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 14, 2026 | 08:51 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाचा परदेशातही डंका
  • परदेशात ‘या’ ठिकाणी प्रदर्शित होणार चित्रपट
  • कलाकारांनी व्हिडिओ शेअर करत दिली खुशखबर
२०२६ या नवीन वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटासाठी खास ठरली आहे. आता ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगल्या कमाई करण्याच्या मार्गावर असताना, आता हा चित्रपट परदेशातही धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. १ जानेवारी २०२६ रोजी रीलिज झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी तेराव्या दिवशीही अजूनही चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी झालेली दिसून येत आहे. ‘मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा जगवा’, असे म्हणणाऱ्या या चित्रपटाच्या टीमने मोठी झेप घेतल्याचे दिसत आहे. कारण परदेशात काही महत्वाच्या ठिकाणी हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्याची माहिती कलाकारांनी दिली आहे.

अॅमेझॉन एमएक्स प्लेयरच्या वतीने ‘भारत के सुपर फाउंडर्स’ च्या ट्रेलरचे अनावरण, भारतातील नवोदित उद्योजकांसाठी 100 कोटींची गुंतवणूक

परदेशात कुठे रीलिज होणार सिनेमा?

अलिकडेच ‘क्रांतिज्योती…’ची निर्मिती संस्था असणाऱ्या’ चलचित्र मंडळी’च्या इन्स्टाग्राम पेजवरुन अशी पोस्ट शेअर करण्यात आली की, ”क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ आता भारतासह दुबई, अबूधाबी, ओमान, शारजाह, बाहरैन येथे खास प्रदर्शित.’ ही आनंदाची बातमी शेअर करताना टीमने अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर आणि क्षिती जोग यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हे कलाकार चाहत्यांसह ही आनंदची बातमी शेअर करताना दिसले आहेत.

 

व्हिडिओमध्ये क्षितीने म्हटले की, ‘नमस्कार आम्ही आहोत क्रांतिज्योती विद्यालयचे विद्यार्थी आणि आम्ही आमचा सिनेमा ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ घेऊन येणार आहोत, तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये…’ तर अमेयने म्हटले की, ‘भारतात गाजणारा आमचा हा सिनेमा आम्ही घेऊन येतोय खास तुमच्यासाठी दुबई, अबूधाबी, ओमान, शारजाह, बाहरैन… सगळीकडे खास तुमच्यासाठी.’ सिद्धार्थने याकरता कोणाशी संपर्क साधायचा याविषयीही माहिती सांगितली.

अभि – क्रितिकाच्या केळवणानंतर आता हळदीचा जल्लोष सुरु; ‘लग्नाचा शॉट’ चे शीर्षक गीत रिलीज

महाराष्ट्रात गाजत असलेला हा मराठी चित्रपट आता परदेशातही गाजणार आहे, यावरुन प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. आणि व्हिडिओला भरभरून प्रतिसाद देत आहेत. कमेंट करत अनेक चाहत्यांनी चित्रपटाचे आणि कलाकारांचे कौतुक केले आहे. दरम्यान या चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कमाईबद्दल सांगायचे झाल्यास, चित्रपटाच्या रीलिजनंतर अवघ्या १३ दिवसात ‘क्रांतिज्योती…’ चित्रपटाने ने ११.४० कोटींची कमाई केली आहे.

Web Title: Krantijyoti vidyalay marathi madhyam releasing in dubai abu dhabi sharjah oman and bahrain kshitee jog amey wagh siddharth chandekar shared video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

अभि – क्रितिकाच्या केळवणानंतर आता हळदीचा जल्लोष सुरु; ‘लग्नाचा शॉट’ चे शीर्षक गीत रिलीज
1

अभि – क्रितिकाच्या केळवणानंतर आता हळदीचा जल्लोष सुरु; ‘लग्नाचा शॉट’ चे शीर्षक गीत रिलीज

Akola News : उबाठा आणि प्रहार पक्षाच्या युतीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक प्रचार, भाजपवर सडकून टीका
2

Akola News : उबाठा आणि प्रहार पक्षाच्या युतीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक प्रचार, भाजपवर सडकून टीका

Kolhapur :  “महायुतीला धास्ती त्यामुळे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात यावं लागलं” – सतेज पाटील
3

Kolhapur : “महायुतीला धास्ती त्यामुळे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात यावं लागलं” – सतेज पाटील

Pune Election : प्रभाग 25 मधील प्रश्न का सुटले नाही? काँग्रेसचे उमेदवार निरंजन दाभेकर यांचा सवाल
4

Pune Election : प्रभाग 25 मधील प्रश्न का सुटले नाही? काँग्रेसचे उमेदवार निरंजन दाभेकर यांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.