Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट! चित्रपटाचे सगळे शो Housefull, इतर चित्रपटांना टाकले मागे

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा रेकॉर्ड तयार केला आहे. या चित्रपटाने पहिल्यात आठव्यात जास्त कमाई सगळे चित्रपटगृह हाऊसफुल करून टाकले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 11, 2026 | 09:44 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘क्रांतिज्योती विद्यालय..’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट
  • पहिल्याच आठवड्यात चित्रपटाची एकूण कमाई?
  • चित्रपटाचे सगळे शो थिएटरमध्ये हाऊसफुल
 

मराठी शाळेच्या वास्तवाशी जोडलेली आणि भावनिक नाळ निर्माण करणारी कथा मांडणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे. सकाळी ७ वाजताचा पहिला शो असो वा रात्री १२ वाजताचा शेवटचा शो, दोन्ही वेळांना चित्रपटगृहं हाऊसफुल भरताना दिसत आहेत. हिंदी आणि दक्षिणात्य बिग बजेट चित्रपटांच्या स्पर्धेतही या मराठी चित्रपटाने आपले स्थान ठामपणे अधोरेखित केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहेत.

अनेक चित्रपटगृहांमध्ये (सिंगल स्क्रीन) इतर चित्रपटांचे शो कमी करून ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चे शो वाढवले जात आहेत. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ६.१४ कोटींची उल्लेखनीय कमाई केली असून, दुसऱ्या आठवड्यात या यशाला आणखी वेग मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मराठी आशयप्रधान चित्रपटासाठी हा प्रतिसाद विशेष मानला जात आहे. आणि बुकिंग प्लॅटफॉर्मवरही चित्रपट सतत ट्रेंडिंगमध्ये आहे. तसेच चित्रपटाला मिळणार प्रतिसाद पाहून चित्रपट निर्माते देखील खुश होत आहेत.

अखेर एकमेकांचे झाले नुपूर आणि स्टेबिन, अडकले लग्नबंधनात; बहिणीला वधूच्या रूपात पाहून क्रिती भावुक, पाहा Video

प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चित्रपटाचे भरभरून कौतुक होत आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे, कलाकारांची कामगिरी, संगीत आणि कथानक यांची विशेष दखल प्रेक्षक घेत आहेत. “हेमंत ढोमे यांनी अत्यंत उत्कृष्ट चित्रपट दिला आहे,” “शाळेतील आठवणी पुन्हा जिवंत झाल्या आहेत,” “मराठी भाषा आणि मराठी शाळेची गळचेपी कोणताही अतिरेक न करता प्रभावीपणे मांडली आहे,” अशा प्रतिक्रिया सातत्याने व्यक्त होत आहेत. चित्रपटाची संवेदनशील मांडणी प्रेक्षकांना भावुक करून असल्याचे अनुभव अनेकांकडून समोर येत आहेत.

या यशाबद्दल लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, “मराठी प्रेक्षक दर्जेदार आणि आशयपूर्ण चित्रपटाला नेहमीच मनापासून साथ देतो. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ला मिळणारा प्रतिसाद प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर अपेक्षेपलीकडचा आहे. इतका मोठा आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद आम्ही कल्पनाही केली नव्हती. सकाळपासून रात्रीपर्यंत हाऊसफुल शो, प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसणारी भावुकता आणि चित्रपटानंतर मिळणाऱ्या प्रतिक्रिया हे सगळं अत्यंत भारावून टाकणारं आहे. चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देण्याची संस्कृती हीच मराठी चित्रपटसृष्टीची खरी ताकद आहे. या प्रेमाने संपूर्ण टीमला नव्या उमेदीने पुढे काम करण्याचं बळ दिलं आहे.” असे ते म्हणाले आहेत.

नेमकं कसं आहे Bigg Boss Marathi 6 सीझनचं आलिशान घर? 800 खिडक्या 900 दारं; पाहा Video

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट सध्या चर्चेत असून, या चित्रपटामध्ये सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट उत्कृष्ट अभिनय करताना दिसले आहेत. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. क्षिती जोग या चित्रपटाची निर्माती आहेत. तसेच सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.

Web Title: Krantijyoti vidyalaya marathi madhyam is a runaway hit at the box office all shows of the film are housefull

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi movie

संबंधित बातम्या

नेमकं कसं आहे Bigg Boss Marathi 6 सीझनचं आलिशान घर? 800 खिडक्या 900 दारं; पाहा Video
1

नेमकं कसं आहे Bigg Boss Marathi 6 सीझनचं आलिशान घर? 800 खिडक्या 900 दारं; पाहा Video

अखेर एकमेकांचे झाले नुपूर आणि स्टेबिन, अडकले लग्नबंधनात; बहिणीला वधूच्या रूपात पाहून क्रिती भावुक, पाहा Video
2

अखेर एकमेकांचे झाले नुपूर आणि स्टेबिन, अडकले लग्नबंधनात; बहिणीला वधूच्या रूपात पाहून क्रिती भावुक, पाहा Video

२२ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाची शानदार सुरुवात, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांचा एशियन कल्चर पुरस्काराने गौरव
3

२२ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाची शानदार सुरुवात, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांचा एशियन कल्चर पुरस्काराने गौरव

‘लग्नाचा शॉट’चा टिझर रिलीज, प्रियदर्शिनी-अभिजीत या नव्या जोडीचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
4

‘लग्नाचा शॉट’चा टिझर रिलीज, प्रियदर्शिनी-अभिजीत या नव्या जोडीचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.