Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“लागली पैज?” नाटकातून रुमानी खरे आणि यशोमन आपटे झळकणार एकत्र, ‘या’ दिवशी होणार शुभारंभ

अभिनेता यशोमन आपटे या नाटकात प्रमुख भूमिका साकारत असून अभिनेत्री रुमानी खरे या नाटकातून व्यावसायिक नाट्य रंगभूमीवर पदार्पण करत आहे

  • By अमृता यादव
Updated On: Nov 05, 2025 | 04:22 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी व्यावसायिक रंगभूमीवर सध्या उत्तमोत्तम नाटके येत आहेत, या नाटकांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. त्यात आता “लागली पैज?” या नव्याकोऱ्या नाटकाची भर पडणार आहे. मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून या नाटकाची सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आहे. आजवर अनेक मालिकांमधून घराघरात पोहचलेला चार्मिंग बॉय, तरुणाईचा आवडता चेहरा अर्थात अभिनेता यशोमन आपटे या नाटकात प्रमुख भूमिका साकारत असून अभिनेत्री रुमानी खरे या नाटकातून व्यावसायिक नाट्य रंगभूमीवर पदार्पण करत आहे. २१ नोव्हेंबरला दुपारी चार वाजता दीनानाथ नाट्यगृहात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.

प्रभात थिएटर्सने निर्मिती केलेल्या ‘लागली पैज?’ या नाटकाचे निर्माते श्रीमती ज्योती कठापूरकर व निखिल करंडे आहेत, तर ज्योती पाटील, प्रियांका बिष्ट, रूपा करोसिया आणि मनोज मोटे हे सहनिर्माते आहेत. नाटकाचे लेखन हर्षद प्रमोद कठापूरकर यांचे असून अंकुर अरुण काकतकर दिग्दर्शित या नाटकात यशोमान आपटे, रुमानी खरे यांच्यासह सुप्रिया विनोद, शंतनू अंबाडेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. बऱ्याच वर्षांनंतर संदीप खरे यांनी नाटकासाठी गाणी लिहिली असून त्यांनी लिहिलेल्या गीतांना साई-पियुष यांनी संगीत दिले आहे तर संतोष शिदम हे सूत्रधार आहेत.

‘माझी मैत्रीण, माझी प्रियसी…’ केएल राहुलने अथिया शेट्टीला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; शेअर केली पोस्ट

“लागली पैज? ” आजच्या तरुणाईच्या नात्याची गोष्ट सांगते.गीतकार संदीप खरे यांची कन्या रुमानीनं आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. मात्र, आता “लागली पैज?” या नाटकातून रुमानी खरे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहे. नात्यामध्ये प्रेम आणि महत्वाकांक्षा ह्यांमध्ये जेव्हा निवड करण्याची वेळ येते तेव्हा निर्माण होणारी भावनिक गुंतागुंत यावर या नाटकाचे कथानक बेतले आहे. आदित्य आणि रेवा या जोडप्यात रेवाला सतत पैज लावण्याची सवय असते. अशावेळी दोघंजण नातं टिकवून ठेवण्याची पैज लावतात, मग त्यांच्या नात्याचं काय होतं, या प्रश्नाचं उत्तर नाटक पाहिल्यावरच मिळणार आहे.

Bigg Boss 19: गौरवच्या मेहनतीवर फेरले पाणी, अमाल मलिक बनला नवा कॅप्टन; घरातील स्पर्धकांमध्ये झाला वाद

Web Title: Lagli paij marathi theatre play rumani khare yashoman apte seen together released on 21st november

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 04:22 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi actress

संबंधित बातम्या

‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा श्रीगणेशा! हृता दुर्गुळे – सारंग साठ्ये दिसणार पहिल्यांदाच एकत्र
1

‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा श्रीगणेशा! हृता दुर्गुळे – सारंग साठ्ये दिसणार पहिल्यांदाच एकत्र

Daya Dongre Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन, मराठी चित्रपटसृष्टीने गमावला एक बहुमुखी कलाकार
2

Daya Dongre Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन, मराठी चित्रपटसृष्टीने गमावला एक बहुमुखी कलाकार

‘स्मार्ट सुनबाई’चा ट्रेलर प्रदर्शित, कौटुंबिक नात्यांची, रहस्याची आणि हसवणुकीची भन्नाट मेजवानी!
3

‘स्मार्ट सुनबाई’चा ट्रेलर प्रदर्शित, कौटुंबिक नात्यांची, रहस्याची आणि हसवणुकीची भन्नाट मेजवानी!

Tejaswini Lonariचा पारंपरिक अंदाज! आईच्या आवडीचे दागिने आणि मराठमोळा साज ठरला चर्चेचा विषय, साखरपुड्याचा लूक पाहा
4

Tejaswini Lonariचा पारंपरिक अंदाज! आईच्या आवडीचे दागिने आणि मराठमोळा साज ठरला चर्चेचा विषय, साखरपुड्याचा लूक पाहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.