(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. तिला सर्व स्तरातून शुभेच्छा मिळत आहेत. आता, तिचा पती आणि क्रिकेटपटू केएल राहुलनेही तिला खास पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केएल राहुलने सोशल मीडियावर अथियासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. तसेच त्याने गोड कॅप्शन लिहून पत्नीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. चाहते या पोस्टला प्रतिसाद देत आहेत.
‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा श्रीगणेशा! हृता दुर्गुळे – सारंग साठ्ये दिसणार पहिल्यांदाच एकत्र
केएल राहुलने इन्स्टाग्रामवर अथिया शेट्टीसोबतचे काही गोंडस फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये, अथिया तिच्या पतीच्या मिठीत पोज देताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये, ती शॉपिंग करताना आरशात सेल्फी घेताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये, अथिया बॅकग्राउंडमध्ये केएल राहुलसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. अथिया शेट्टी नुकतीच आई झाली असून आज ती तिच्या मुलीसोबत तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. आणि या कपलच्या फोटोला चाहते कंमेंट करून प्रतिसाद दिला आहे.
“माझी सर्वात चांगली मैत्रीण…” – केएल राहुलने लिहिले
केएल राहुलने हे फोटो शेअर केले आहे आणि कॅप्शनमध्ये त्याची पत्नी अथिया शेट्टीवर प्रेमाचा वर्षाव केला. क्रिकेटपटूने तिला त्याची सर्वात चांगली मैत्रीण आणि प्रियसी म्हटले आहे. राहुलने लिहिले, “माझी सर्वात चांगली मैत्रीण, पत्नी, प्रियसी, स्ट्रेस बॉल, गूफबॉलला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी प्रत्येक वर्षासह तुला अधिक प्रेम करतो.” अथियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या पतीची पोस्ट शेअर केली. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये हृदय आणि जगाचे इमोजी जोडले.
इलैयाराजा यांच्या सुरेल संगीतानं सजलं ‘चांदण’, ‘गोंधळ’ चित्रपटामधील पहिलं गाणं प्रदर्शित
वडील सुनील शेट्टी यांनीही अथियासाठी लिहिली पोस्ट
अथिया शेट्टी आज ३३ वर्षांची झाली आहे. तिचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांनीही तिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या मुलीसोबतचा फोटो शेअर करताना ज्येष्ठ अभिनेत्याने लिहिले, “माझे हृदय एका माणसात आहे, एक सुंदर आत्मा… एक सुंदर दिवस… वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या बाळा… चमकत राहा, पुढे जात राहा.” असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.






