Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुला पाहता’तून उमलणार पहिल्या प्रेमाची जादू, सतीश पुळेकर–इला भाटेची खास केमिस्ट्री पाहायला मिळणार

प्रत्येक अनोख्या कथेची सुरुवात एका नव्या दृष्टिकोनातून होते. एका नव्या युगाला एका नव्या प्रकारच्या ऊर्जेची गरज असते आणि ती मानसी पाटील आणि नचिकेत लेले मध्ये पाहायला मिळेल.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 20, 2026 | 11:31 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

“प्रेम कसे करायचे हे अनेकजण शिकवतात, पण ते विसरायचे कसे हे कोणी सांगत नाही,” अशी हळवी भावना मांडणारा ‘तुला पाहता’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.या चित्रपटात प्रेम कधीही, कुठेही होऊ शकते आणि त्याला वयाचे बंधन नसते, ही संकल्पना दाखवण्यात आली आहे. एखादी आवडती व्यक्ती आयुष्यातून अचानक निघून गेली आणि अनेक वर्षांनी ती पुन्हा समोर आली, तर काय घडेल? याची रंजक आणि भावनिक गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे.‘तुला पाहता’ हा चित्रपट १९७० च्या दशकापासून आजच्या काळापर्यंतचा प्रवास दाखवतो. ७० च्या दशकातील वेशभूषा, वातावरण आणि संगीत यामुळे प्रेक्षकांना त्या काळाचा अनुभव मिळणार आहे. तर आजच्या काळातील कथा ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ आणि ‘पिढ्यांमधील अंतर’ (Generation Gap) यांसारख्या महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश टाकते.एकूणच, काळ बदलत असला तरी प्रेमाच्या भावना कशा टिकून राहतात, हे दाखवणारी ही एक हृदयस्पर्शी कथा असणार आहे.

प्रत्येक अनोख्या कथेची सुरुवात एका नव्या दृष्टिकोनातून होते. एका नव्या युगाला एका नव्या प्रकारच्या ऊर्जेची गरज असते आणि ती मानसी पाटील आणि नचिकेत लेले मध्ये पाहायला मिळेल. ह्या चित्रपटात तुम्हाला सतीश पुळेकर, इला भाटे ही जोडी हि पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळेल .

चित्रपटातील कलाकार

या चित्रपटात सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, अभिनेत्री इला भाटे, नचिकेत लेले, मानसी पाटील, यांच्यासह निशिगंधा वाड, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्नील परजाणे, आकाश शिंदे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. नव्या-जुन्या पिढीच्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय या चित्रपटातून पाहता येणार आहे.

Bigg Boss Marathi 6 Winner : राखीचा राकेश बापट ठरला रनर अप! Tanvi Kolte ने मारली बाजी, बिग बॉस मराठी ६ गाजवत ठरली विजेती

ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान यांनी ‘तुला पाहता’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनही मयुरा प्रधान यांनीच केले आहे.चित्रपटाचे छायांकन पुष्कर झोटिंग यांनी केले आहे. संगीत दिग्दर्शन रोहन प्रधान आणि रोहन गोखले यांनी केले असून नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी दीपाली विचारे यांनी सांभाळली आहे.नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. लक्षवेधी पोस्टरमुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट १० जुलै रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.‘तुला पाहता’ हा सहकुटुंब पाहता येणारा भावनिक आणि रोमँटिक चित्रपट असल्याने प्रेक्षकांमध्ये याची खास चर्चा सुरू आहे.

Bigg Boss Marathi Grand Finale: महाराष्ट्राच्या वहिनींचा ‘मराठमोळा’ साज, स्टेजवर रितेशला ‘अहो’ म्हणाली जेनेलिया अन्…

Web Title: Magic of first love unfolds in tula pahata satish pulekar and ila bhates special chemistry to be seen on screen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Daryabhavani: चित्रपटाच्या यशासाठीच नाही, कलाकार-तंत्रज्ञांच्या सुखासाठीही मागितलं आशीर्वादाचं गाऱ्हाणं!
1

Daryabhavani: चित्रपटाच्या यशासाठीच नाही, कलाकार-तंत्रज्ञांच्या सुखासाठीही मागितलं आशीर्वादाचं गाऱ्हाणं!

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली
2

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत
3

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार
4

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.