Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रील स्टार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस, प्रसाद ओकसह दिसणार ‘ही’ तगडी स्टारकास्ट

मराठी आगामी चित्रपट 'रील स्टार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तसेच या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्यामुळे चित्रपटाची कहाणी स्पष्ट दिसून आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 28, 2025 | 03:04 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘रील स्टार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस
  • प्रसाद ओकसह दिसणार ‘ही’ तगडी स्टारकास्ट
  • चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलरने वेधले लक्ष
दमदार संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर ‘रील स्टार’ या बहुचर्चित आगामी मराठी चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. रायमा सेन, अवधूत गुप्ते, आकाश ठोसर, सायली पाटील, सोमनाथ अवघडे, गौरव मोरे, अनंत महादेवन, गुरू ठाकूर, आदर्श शिंदे इत्यादी हिंदी आणि मराठी सिनेविश्वातील दिग्गज कलाकारांनी ‘रीलस्टार’चा ट्रेलर शेअर केला आहे. ‘रील स्टार’मध्ये नेमके काय पाहायला मिळणार याची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसली आहे. मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावणारा चित्रपट ‘रील स्टार’च्या रूपात पाहायला मिळणार असल्याचे संकेत ट्रेलर पाहिल्यावर मिळत आहेत. १४ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

अखेर The Family Man 3 ची संपली प्रतीक्षा, ‘या’ दिवशी २४० हून अधिक देशांमध्ये होणार जागतिक प्रीमियर

‘जर एक सामान्य माणूस मनापासून सत्तेच्या बाजूने उभा राहिला ना, तर संपूर्ण सिस्टीम वठणीवर आणू शकतो’, असे म्हणत ‘रील स्टार’ या मराठी चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सायकलवरून फिरून सामान विकणाऱ्या भानुदास नावाच्या रस्त्यावरील एका विक्रेत्याची आणि त्याच्या कुटुंबाची कथा या चित्रपटात आहे. भानुदास जरी सायकलवरून सामान विकत असला तरी कमालीची रील बनवण्याची कला त्याच्या अंगी आहे. भानुदास आणि याच्या पत्नीची काही स्वप्ने आहेत. त्या स्वप्नांची गोष्ट ‘रील स्टार’मध्ये पाहायला मिळणार आहे.

 

सत्ता, संघर्ष, जाती-पातीचे राजकारण आणि पैशांचा पॉवरगेमही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक सिम्मी आणि रॉबिन यांनी ‘रील स्टार’द्वारे वास्तवदर्शी कथानक प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘या चित्रपटाची कथा आपल्या सर्वांच्या आजूबाजूलाच घडणारी आहे असे प्रेक्षकांना वाटेल. सर्वसामान्य माणसाच्या स्वप्नांची सांगड, संघर्ष आणि समाजव्यवस्थेतील राजकारणाशी घालून आम्ही एक मनोरंजक चित्रपट बनवला आहे. सुमधूर गीत-संगीत आणि दमदार अभिनय या चित्रपटाच्या सर्वात मोठ्या जमेच्या बाजू आहेत. दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेला एक परीपूर्ण चित्रपट ‘रील स्टार’च्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळेल’ , असेही त्यांनी सांगितले.

प्रभासच्या ‘Baahubali The Epic’ ने रिलीजआधीच Advance Booking मध्ये मारली बाजी, केले एवढे कलेक्शन

जोस अब्राहम, मोनिका आणि निशील कंबाती यांनी जे-फाइव्हज एंटरटेनमेंट्स, फिनिक्स ग्रुप आणि इनिशिएटिव्ह फिल्म्सच्या बॅनरखाली ‘रीलस्टार’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. मल्टीस्टारर हिंदी-मराठी ‘अन्य’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सिम्मी आणि रॉबिन यांनी ‘रील स्टार’चे दिग्दर्शन केले आहे. सिम्मी आणि कृष्णा एंटरप्रायझेस हे चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. नागराज मंजुळे यांचे सहायक दिग्दर्शक सुधीर कुलकुर्णी यांनी ‘रीलस्टार’चे लेखन केले आहे. या चित्रपटात वेगवेगळ्या मुड्समधील आणि वेगवेगळ्या प्रसंगाना अनुसरून एकूण पाच गाणी आहेत. ‘दृश्यम’ फेम संगीतकार विनू थॉमस यांनी या चित्रपटातील चार गीतांना संगीतसाज चढवला असून, एक गाणे संगीतकार शुभम भट यांनी संगीतबद्ध केले आहे.

नागराज मंजुळे यांचे बंधू भूषण मंजुळे या चित्रपटात शीर्षक भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तसेच दमदार व्यक्तिरेखेत प्रसाद ओक आहे. या दोघांच्या जोडीला मिलिंद शिंदे, कैलास वाघमारे, उर्मिला जे जगताप, रुचिरा जाधव, स्वप्नील राजशेखर, शुभांगी लाटकर, विजय पाटकर, अनंत महादेवन, ज्ञानेश वाडेकर, महेश सुभेदार, शिवाजी पाटणे, गणेश रेवडेकर, अभिनय पाटेकर, विशाल अर्जुन, राजेश मालवणकर, जगदीश हाडप, पुनम राणे, अभय शिंदे, अनिल कवठेकर, विनिता शिंदे, प्रशांत शिंदे, करीश्मा देसले हे कलाकार दिसणार आहेत.

 

Web Title: Marathi movie reel star releasing on november 14 2025 watch the trailer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित
1

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
2

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
3

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
4

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.