(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारतीय सिनेमाचा सर्वात भव्य अध्याय ‘बाहुबली’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परत येत आहे. एस. एस. राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या चित्रपटाचा एक्सटेंडेड वर्जन आता रिलीजसाठी तयार आहे. रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाने एडव्हान्स बुकिंगमध्ये जोरदार यश मिळवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ‘बाहुबली: द एपिक’च्या री-एडिटेड वर्जनच्या बुकिंग सुरू होताच काही तासांत 2 कोटी रुपयांहून अधिक तिकिटे विकली गेली. हैदराबादसह अनेक शहरांमध्ये शोज मिनिटांमध्ये हाऊसफुल झाले. या चित्रपटाच्या नवीन रूपाला ‘वन एपिक कट’ असे नाव दिले गेले आहे, ज्यात ‘बाहुबली: द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’ एकत्र करून भव्य सिनेमॅटिक अनुभव तयार केला गेला आहे. सैकनिल्कच्या अहवालानुसार, प्रति तास 5000 हून अधिक तिकिटांची विक्री होत आहे.
“….त्यांना मला जिंकू द्यायचेच नाही,” ‘बिग बॉस १९’ मधून बाहेर पडताच हे काय म्हणाला बसीर? घरातील सदस्यांचा केला पर्दाफाश
फक्त भारतातच नव्हे, तर विदेशातही ‘बाहुबली: द एपिक’ ने विक्रम मोडणारी सुरुवात केली आहे. उत्तर अमेरिकेत चित्रपटाने सुमारे 1.6 कोटी रुपये एडव्हान्स बुकिंग केली आहे, जी कोणत्याही भारतीय री-रिलीजसाठी मोठी उपलब्धी आहे. जगभरात चित्रपटाचे प्री-सेल्स 5 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडले असून, हे दाखवते की राजामौली आणि प्रभासची जोडीची जादू अजूनही कायम आहे.
#BaahubaliTheEpic All India Advance Sales Nearing ₹2.5Cr..💥💥 USA Advance Sales Stand at Around $235K..🔥🔥
(Limited Release Only) First-Ever $1 Million Gross Loading for a Re-Release Movie..💥💥 ₹100Cr Lifetime Gross is Possible..🔥🔥pic.twitter.com/FMqnJa7Tq6 — CineContent (@1312_sri) October 27, 2025
चित्रपट 31 ऑक्टोबरला री-रिलीज होणार आहे. हा चित्रपट चार भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हिंदी, मलयाळम, तेलुगु आणि तमिळ. एडव्हान्स बुकिंगच्या यशामुळे स्पष्ट झाले आहे की, एकदा पुन्हा बाहुबलीचा जादू मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.






